१२ वर्षांपूर्वीच वैज्ञानिकांनी दिली होती चेतावणी
आसुरी सवयीमुळे आज जग विनाशाच्या खाईत लोटले जात आहे, हे आतातरी स्वतःला अधिक प्रगत समजणार्यांच्या लक्षात येईल का ?
नवी देहली – चीनच्या वुहान शहरामधून कोरोना विषाणू जगभरात पसरलेला आहे. कोरोेनाचा असा प्रकोप होण्याची शक्यता १२ वर्षांपूर्वीच काही वैज्ञानिकांनी दिली होती, असे आता समोर आले आहे. याविषयीचा एक प्रबंधही लिहिण्यात आला होता. वर्ष २००७ मध्ये प्रसिद्ध झालेल्या या प्रबंधानुसार ‘दक्षिण चीनमध्ये लोकांच्या स्तनधारी प्राणी खाण्याची सवय एक टाईमबॉम्ब आहे. वटवाघुळांच्या शरिरात अनेक विषाणूंचे निवास असते. त्यांना खाल्यामुळे, तसेच प्राण्यांच्या बाजारांतून या विषाणूंचा प्रादुर्भाव लोकांना होऊ शकतो. त्यामुळे योग्य काळजी घेणे आवश्यक आहे’, असे म्हटले होते. प्रत्यक्षातही कोरोनाचे विषाणू वुहान शहरातील प्राण्यांच्या बाजारातून आणि वटवाघूळ खाण्यातूनच सर्वत्र पसरला आहे.