गुढीकडून घ्यावयाचा बोध

गुढी ब्रह्मांडातील प्रजापति देवतेच्या लहरी, ईश्‍वरी शक्ती आणि सात्त्विकता स्वत: ग्रहण करते अन् इतरांच्या लाभासाठी त्या सर्वांचे प्रक्षेपण करते. त्याप्रमाणे साधकाने स्वत: साधना करून आनंद मिळवावा आणि समाजालाही आनंद मिळवता यावा, यासाठी समाजात साधनेचा प्रसार करावा.