सार्वजनिक मुतार्यांपेक्षाही प्रसाधनगृहाची लाजिरवाणी स्थिती !
वर्ष २०२३ मध्ये ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींनी राज्यातील जिल्हा ते तालुका पातळीपर्यंतच्या बसस्थानकांची स्वच्छता आणि प्रवाशांसाठीच्या सोयीसुविधा यांचा आढावा घेतला होता. ‘सनातन प्रभात’मधून बसस्थानकांच्या दुरवस्थेची वृत्तमालिका प्रसिद्ध करण्यात आली होती. हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’च्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे तत्कालीन संचालक शेखर चन्ने यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे आमच्या वृत्तांचा संदर्भ देत बसस्थानकांची दु:स्थिती मांडली. त्यानंतर महाराष्ट्रात १ मे २०२३ पासून ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक’ हा उपक्रम चालू करण्यात आला.

मागील ३ वर्षे हे अभियान परिवहन विभागाकडून चालवले जात आहे. अनेक बसस्थानके या अंतर्गत चांगला प्रयत्न करत आहेत. राज्यातील बसस्थानकांमध्ये याद्वारे आमूलाग्र पालटही होत आहे; परंतु अद्यापही काही बसस्थानके स्वच्छतेकडे कमालीचे दुर्लक्ष करतात. स्वच्छतेच्या किमान गोष्टींकडेही अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. ही स्थिती सरकार आणि समाज यांच्या लक्षात आणून देण्यासाठी ‘सनातन प्रभात’ पुन्हा एकदा बसस्थानकांच्या दु:स्थितीविषयीची वृत्तमालिका चालू करत आहे.

मुंबई – बोरीवली (पूर्व) येथील नॅन्सी एस्.टी. बसस्थानकातून राज्यातील विविध जिल्ह्यांसह अन्य राज्यांतही बस वाहतूक होते. पश्चिम मुंबईतील या महत्त्वाच्या बसस्थानकामध्ये स्वच्छतेची मात्र वानवा आहे. तुंबलेले शौचालय आणि मुतार्या, त्यांची तुटलेली दारे, घाणीने माखलेल्या भिंती अशी स्थिती आहे. सार्वजनिक मुतार्या बर्या म्हणाव्या, अशी या बसस्थानकांतील प्रसाधनगृहाची दु:स्थिती आहे. प्रसाधनगृहाची अवस्था पाहून एखादा मागेच फिरेल, अशी दयनीय अवस्था आहे. ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहराने पहाणी केली, तेव्हा या प्रसाधनगृहाच्या बाहेरही मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या पिशव्यांचा कचरा होता. अनेक दिवस या परिसराची स्वच्छता करण्यात आली नसल्याचे दिसून आले.
#Fix_MSRTC_BusStands_Now
Ground Report | Nancy ST Bus Stand, Borivali (E), Mumbai
❌ Filthy toilets
❌ Broken doors
❌ Faulty water taps
❌ Garbage & potholes
❌ Alcoholics on premises
❌ Staff shortageImmediate inspection and corrective action needed.@msrtcofficial… pic.twitter.com/8JHvafUkZS
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 9, 2026
नॅन्सी एस्.टी. बसस्थानकातील अन्य सुविधांची दुरवस्था !

१. बसस्थानकामध्ये एक चौकोनी पाणपोई आहे; मात्र या पाणपोईचे काही नळ अनेक दिवसांपासून नादुरुस्त आहेत. पाणपोईच्या खालीही कचरा साचलेला होता.
२. बसस्थानकाचा परिसर साधारण ३ एकर इतका आहे. या परिसरातील दुर्लक्षित कोपर्यांमध्ये सकाळी ११.३० ते दुपारी १२ या वेळेत काहीजण मद्य पीत बसले होते. ‘गर्दुल्ले आणि बसस्थानकाच्या बाजूच्या झोपडपट्टीमधील काही जण मद्य पिण्यासाठी बसस्थानकातील जागेचा उपयोग करतात’, असे तेथील एका कर्मचार्याने सांगितले. बसस्थानकाला साधारण ५ फूट उंच संरक्षक भिंत आहे; मात्र त्यावरून उड्या टाकून हे मद्यपी येतात.


३. बसस्थानकांच्या परिसरात काही ठिकाणी झुडपे वाढली आहेत. बसस्थानकांच्या परिसरात काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यांत पाणी साचते.
अपुरे कर्मचारी आणि निधीची कमतरता !
‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने बसस्थानकाचे साहाय्यक वाहतूक निरीक्षक अरुण गडरी यांची भेट घेऊन त्यांना बसस्थानकाच्या स्थितीविषयी विचारणा केली असता ते म्हणाले, ‘‘बसस्थानकातील शौचालयाचे बांधकाम स्थानिक आमदारांच्या निधीतून करण्यात आले आहे. या शौचालयाच्या स्वच्छतेचे कंत्राट खासगी कंत्राटदारकडे होते. कंत्राटाचा कालावधी संपल्यामुळे सध्या प्रसाधनगृहाची स्वच्छता महामंडळाचे कर्मचारी करतात. कर्मचारी अपुरे असल्यामुळे, तसेच बसस्थानकाचा परिसर मोठा असल्यामुळे स्वच्छता राखण्यास मर्यादा येतात. काही गर्दुल्ले बसस्थानकाच्या परिसरात येऊन मद्यपान करतात. त्यांना रोखण्यासाठी संरक्षण भिंतींची उंची वाढवणे आणि सुरक्षारक्षकांची नियुक्ती करणे आवश्यक आहे.’’



एकूणच या बसस्थानकातील प्रसाधनगृहाची दूरवस्था, त्यांची स्वच्छता, पाणपोईच्या नळांची दुरुस्ती, बसस्थानक परिसरात स्वच्छता राखणे, बसस्थानकाच्या परिसरातील खड्डे बुजवणे, परिसरात येणार्या मद्यपींना रोखणे आदींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. महामंडळाद्वारे किंवा लोक सहभागातून या कामांसाठी निधीचे प्रावधान करणे आवश्यक आहे.
हे ही वाचा → वल्लभनगर (पिंपरी-चिंचवड) बसस्थानकावर प्रवाशांच्या गैरसोयींचा ‘प्रवास’ चालूच !
वर्ष २०२३ मध्ये ‘सनातन प्रभात’मधून बसस्थानकांच्या दुरवस्थेची प्रसिद्ध झालेली वृत्तमालिका –
खालील प्रत्येक ओळीवर क्लिक करा, वाचा आणि पहा –
- अमृत महोत्सवी वर्षी एस्.टी.वर साडेतेरा सहस्र कोटी रुपये तोट्याचा भार घेऊन धावण्याची वेळ !
- अस्वच्छ एस्.टी. स्थानकांविषयी ‘सुराज्य अभियाना’ची राज्य सरकारने घेतली नोंद !
- अत्यंत अस्वच्छता, मोकाट जनावरे, इमारतीची दुरवस्था यांसह अनेक समस्या असलेले अक्कलकोट बसस्थानक !
- सिंधुदुर्ग : सावंतवाडी बसस्थानकाचे काम अनेक वर्षे अपूर्ण असल्याने प्रवासी आणि कर्मचारी यांची असुविधा
- #Exclusive : तुटलेली आसने, भिंतींची पडझड यांमुळे दापोली (रत्नागिरी) बसस्थानकाची दुरवस्था !
- #Exclusive : स्वारगेट (पुणे) बसस्थानकातील नवीन शेड झाली मद्यपींचा अड्डा !
- #Exclusive : उघड्यावर टाकण्यात येणार्या कचर्यामुळे सातारा बसस्थानकात झाला आहे उकिरडा !
- #Exclusive : रत्नागिरी बसस्थानकाच्या प्रवेशद्वारातच सोडले जाते मुतारीचे सांडपाणी !
- प्रशासनाने रत्नागिरी बसस्थानकावरील खड्डे बुजवले, प्रवेशद्वारावरील सांडपाण्याचीही लावली योग्य विल्हेवाट !
- #Exclusive : चालक-वाहक यांच्या विश्रामगृहाची दुरवस्था असलेले वणी (यवतमाळ) बसस्थानक !
- #Exclusive : कराड (जिल्हा सातारा) बसस्थानकावर तंबाखूच्या पिचकार्यांनी रंगलेल्या अस्वच्छ भिंती !
- #Exclusive : राजापूर (रत्नागिरी) बसस्थानकातील पडक्या उपाहारगृहामुळे कर्मचारी आणि प्रवासी यांचा जीव दावणीला बांधलेला !
- #Exclusive : जळमटांनी माखलेले छत, प्रवेशद्वारावर कचरा आदी अस्वच्छतेकडे दुर्लक्ष करणारे अमरावती बसस्थानक !
- #Exclusive : खेड (जिल्हा रत्नागिरी) बसस्थानकावरील खड्ड्यांमुळे प्रवाशांना त्रास !
- #Exclusive : ‘तुंबलेली मुतारी आणि त्यातून बाहेर सोडण्यात आलेली घाण’ असे स्वच्छतेचे सोयरसुतक नसलेले आर्णी (यवतमाळ) बसस्थानक !
- ‘पाणी प्यावे कि नको ?’ असा विचार करायला लावणारी अकोला बसस्थानकावरील पाणपोईची स्थिती !
- भटक्या कुत्र्यांचे निवासस्थान बनलेले भुसावळ (जळगाव) बसस्थानक !
- कसली बसस्थानक स्वच्छता मोहीम ? सावंतवाडी बसस्थानकात उघड्यावरच फेकला जातो कचरा !
- अस्वच्छ प्रसाधनगृह, अपुरी आसनक्षमता आणि मूलभूत सुविधांची वानवा असलेले देवगड (सिंधुदुर्ग) बसस्थानक !
- उघड्यावरील मूत्रविसर्जनामुळे सोलापूर बसस्थानकावर दुर्गंधी : परिसरात कचर्याचे साम्राज्य !
महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती निवडणूक १ जुलैला !
पिंपळी खुर्द येथील महामार्गालगतचे धोकादायक काचेचे भंगार हटवले
Pakistani Soldiers Loot POK : पाकिस्तानच्या सैनिकांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये पेट्रोलपंप लुटला !
शासकीय प्रयोगशाळांमध्ये विषशोधक यंत्रणेचा अभाव !
रामटेकडी ते पुलगेट (पुणे) येथे ८ तास वाहतूककोंडी !
हिंदूंनी ‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणातून शत्रूबोध घ्यावा ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती