ConfirmTkt Controversy : ‘कन्फर्म तिकीट’ आस्थापनाने श्री गणेशाचा अवमान करणारे विज्ञापन हटवले

हिंदु जनजागृती समितीच्या विरोधाचा परिणाम !

श्री गणेशाचा अवमान करणारे विज्ञापन

मुंबई – रेल्वे तिकीट आरक्षित करून देणार्‍या ‘कन्फर्म तिकीट’ या आस्थापनाच्या विज्ञापनात श्री गणेशाच्या चित्राचा वापर करण्यात आला होता. हिंदु जनजागृती समितीद्वारे सामाजिक माध्यमांतून करण्यात आलेल्या तीव्र विरोधानंतर या आस्थापनाने हे विज्ञापन मागे घेतले.

हिंदु जनजागृती समितीने स्पष्ट केले होते की, हिंदूंच्या देवतांचा व्यावसायिक वापर आणि त्यांच्या श्रद्धेला ठेच पोचवणारी विज्ञापने कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाहीत. समितीच्या आवाहनावरून अनेक हिंदु संघटना आणि धर्मप्रेमी यांनी सामाजिक माध्यमांतून विरोध नोंदवला होता.

(ही छायाचित्रे देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून हिंदु विरोधकांनी केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. –  संपादक)

हिंदु जनजागृती समितीच्या मुख्य मागण्या

१. ‘कन्फर्म तिकीट’ने हे विज्ञापन सर्व डिजिटल आणि सामाजिक माध्यम यांवरून तातडीने हटवावे.

२. भविष्यात हिंदूंच्या देवतांच्या चित्रांचा कोणत्याही व्यावसायिक प्रचारात वापर न करण्याची सार्वजनिक घोषणा करावी.

३. आस्थापनाने हिंदु समाजाच्या धार्मिक भावनांचा आदर करत सार्वजनिकरित्या क्षमा मागावी.