वारी निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या आहेत ?

मुंबई उच्च न्यायालयाची राज्य सरकारकडे विचारणा

आषाढी वारीमध्ये वारकर्‍यांच्या आरोग्याची काळजी घ्या ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोना संसर्ग, आषाढी वारीतील सुविधा, पेरण्या, आपत्ती व्यवस्थापन यांविषयी आढावा बैठक

‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या जयघोषात संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी खंडोबाच्या भेटीला !

सोपान काकांच्या सासवडमध्ये २ दिवसांच्या मुक्कामानंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याने २६ जून या दिवशी जेजुरीच्या दिशेने प्रस्थान ठेवले. मल्हारी मार्तंड खंडोबाला भेटण्यासाठी वारकरी मोठे आतुर झालेले असतात.

आषाढी वारीनिमित्त सोलापूर रेल्वे विभागाकडून १० दिवसांत १२५ विशेष फेऱ्यांचे नियोजन !

आषाढी एकादशीच्या निमित्ताने पुणे-पंढरपूर, कुर्डूवाडी-मिरज, लातूर-मिरज, भुसावळ-पंढरपूर, नागपूर-पंढरपूर, बिदर-पंढरपूर आदी मार्गांवर विशेष रेल्वे धावणार आहेत. या गाड्यांमध्ये सर्वसामान्य (जनरल) तिकिटावर वारकऱ्यांना प्रवास करता येणार आहे.

इंद्रायणीचे पाणी दूषित झाल्याने वारकऱ्यांनी ते न वापरण्याचा आळंदी नगरपरिषदेचा आदेश !

प्रशासनाने आषाढी एकादशीपूर्वी चंद्रभागा नदीची तातडीने स्वच्छता का केली नाही ? हे समजले पाहिजे. यामध्ये निष्काळजीपणा करणाऱ्यांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे !

‘वज्रलेप’ करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा नोंद करून कारवाई करावी ! – भाविक वारकरी मंडळाचे निवेदन

मंदिर समितीने घातलेले नियम आणि अटी पूर्णपणे पडताळून घेऊन ज्यांच्यासमवेत करार केला त्या संबंधितांवर, तसेच पूर्वी केलेला लेप करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा नोंद करून कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन भाविक वारकरी मंडळ यांच्या वतीने सोलापूरचे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

पिंपरी (पुणे) येथे दिंडीत भरधाव कंटेनर शिरल्याने एका वारकऱ्याचा मृत्यू !

देहू-आळंदी मार्गावरील चिखलीजवळ देहूहून आळंदीकडे पायी जात असलेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत २० जून या दिवशी भरधाव कंटेनर शिरल्याने भगवान घुगे या वारकऱ्याचा मृत्यू झाला, तर ३ वारकरी घायाळ झाले आहेत.

पुणे येथे ‘वारकरी धारकरी संगम सोहळ्या’चे आयोजन !

श्री शिवप्रतिष्ठानचे धारकरी आणि शिवपाईक यांनी पू. संभाजीराव भिडेगुरुजींच्या मार्गदर्शनाखाली आई श्री तुळजाभवानीच्या आशीर्वादाने मागील ७ वर्षांपासून ही परंपरा पुन्हा चालू केली आहे. लाखो धारकरी प्रत्येक वर्षी तोच आशीर्वाद घेण्यासाठी जातात.

आषाढी वारीमध्ये मूलभूत सुविधांसाठी राज्यशासनाकडून ९ कोटी रुपयांच्या निधीची मान्यता

आषाढी एकादशीनिमित्त पुणे, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांतून विविध संतांच्या पालख्यांसह मार्गक्रमण करणाऱ्या वारकऱ्यांना सोयीसुविधा पुरवण्यासाठी पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना अनुदान देण्यात येते.

पांडुरंगाच्या ओढीने वारीत आनंदाने वाटचाल करणारे वारकरी !

ज्याप्रमाणे कमलपत्र पाण्यावर विसावूनही पाणी त्याला स्पर्श करत नाही, त्याचप्रमाणे प्रत्येक कर्म करतांना शाश्वत अशा चैतन्याच्या सतत सान्निध्यात राहिल्यास तो जीव मायेच्या भौतिक सुखाच्या भवबंधनातून तरून जाऊन सतत आनंदात रममाण होतो. अशा प्रकारचा भक्त भगवंताला प्रिय असतो.