लाखो भाविकांच्या मुखातून होणार्‍या हरिनामाच्या गजराने भक्तीरसात पिंपरी-चिंचवडकर न्हाऊन निघाले !

ज्ञानोबा-माऊली-तुकारामाच्या जयघोषावर महापालिका आयुक्तांनी धरला ठेका !

दिंडी प्रमुखांचा श्री. शेखर सिंह यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

पिंपरी (जिल्हा पुणे) – हरिनामाच्या जयघोषात संत तुकाराम महाराजांच्या पालखीने निगडी येथील भक्ती-शक्ती चौकातून पिंपरी-चिंचवड शहरात प्रवेश केला आणि संपूर्ण वातावरण भारावून गेले.

विठुरायाच्या भक्तीत तल्लीन होऊन नाचणार्‍या भाविकांना पाहून महापालिकेचे आयुक्त आणि अधिकारीही स्वतःला रोखू शकले नाहीत. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ आणि प्रदीप जांभळे-पाटील यांनीही या सोहळ्यात सहभाग नोंदवत ‘ज्ञानोबा-माऊली-तुकाराम’च्या जयघोषावर ठेका धरला. लाखो भाविकांच्या मुखातून होणार्‍या हरिनामाच्या गजराने भक्तीरसात पिंपरी-चिंचवडकर न्हाऊन निघाले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पालखीचे निगडी येथे ११ जूनला दुपारी स्वागत करण्यात आले.