राज्यातील निर्बंध शिथिल करण्याविषयी ‘टास्क फोर्स’ समितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर !

पहिल्या टप्प्यात उपाहारगृहे उघडण्यासाठी सवलती घोषित केल्या जाणार आहेत. उपाहारगृहे चालू ठेवण्याची वेळ रात्री १० वाजेपर्यंत केली जाणार आहे, तर ५० टक्क्यांची मर्यादाही काही प्रमाणात शिथिल केली जाणार असल्याचे समजते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी अपशब्द वापरल्याने आमदार रवि राणा यांच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी अपशब्द वापरल्याने शिवसेनेचे मिरज तालुकाप्रमुख विशालसिंह राजपूत यांच्या नेतृत्वाखाली महाराणा प्रताप चौक येथे आमदार रवि राणा यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.

आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कान्होपात्राचे रोपटे पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिरात लावण्यात येणार !

पुरातन झाड वठल्याने त्या जागी नवीन कान्होपात्राचे झाड लावण्याची सिद्धता मंदिर समितीने केली असून आषाढी एकादशीला हे झाड कान्होपात्राच्या समाधी समोर लावण्यासाठी समितीने कट्टा सिद्ध करून घेतला आहे.

कोयनानगर येथे उभारण्यात येणार्‍या प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांकडे होणार सादरीकरण ! – शंभूराज देसाई, गृहराज्यमंत्री

कोयनानगर येथे राज्य आपत्ती बचाव दल आणि पोलीस प्रशिक्षण उपकेंद्र उभारण्याविषयी प्रस्ताव सिद्ध करून तो मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

विधीमंडळाच्या कामकाजाचा दर्जा खालावत चालला आहे ! – मुख्यमंत्री

विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी जे घडले ते महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी लाजिरवाणे होते. ही आपली संस्कृती नाही. विधीमंडळामध्ये उत्कृष्ट संसदपटू हा पुरस्कार दिला जातो;

‘एम्.पी.एस्.सी.’च्या सर्व रिक्त जागा ३१ जुलैपर्यंत भरणार ! – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

विरोधकांनी उपस्थित केलेल्या सूत्रावर उत्तर देतांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘एम्.पी.एस्.सी.’ची सर्व रिक्त पदे ३१ जुलै २०२१ पर्यंत भरण्याची घोषणा केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ५ ऑक्सिजननिर्मिती संयंत्रांचे लोकार्पण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईतील नेहरू सायन्स सेंटर, बांद्रा भाभा हॉस्पिटल, राजावाडी हॉस्पिटल, कूपर हॉस्पिटल आणि कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजननिर्मिती संयंत्रांचे लोकार्पण केले.

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर देहूगाव आणि आळंदी शहर परिसरात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी २८ जून ते ४ जुलै पर्यंत संचारबंदी !

कोरोनाचा संसर्ग वाढल्याने या वर्षी बसमधून पालखी पंढरपूला रवाना होणार आहे.

कोरोनाची तिसरी लाट येऊ नये, यासाठी नियमांचे पालन करा ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र

कोरोनाची तिसरी लाट कधी येईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे जनतेने कोरोनाच्या अनुषंगाने असलेल्या नियमांचे पालन करून काळजी घ्यावी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे व्यक्त केला.

मुख्यमंत्र्यांच्या अवैध संपत्तीची माहिती ‘ईडी’ला देणार ! – आमदार रवि राणा

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विविध देशांत अवैध संपत्ती असून त्याची माहिती मी मिळवली आहे. ही माहिती अंमलबजावणी संचालनालयाकडे देऊन कारवाईची मागणी करणार आहे. मी आणि माझी पत्नी खासदार नवनीत राणा आम्हाला शिवसेनेकडून लक्ष्य केले जात आहे’,