कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची आकडेवारी लपवली जाते ! – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा आरोप

मुख्यमंत्री १० मास मंत्रालयात जात नाहीत त्यामुळे येणार्‍या निवडणुकीत मुंबईकर शिवसेनेला दाखवून देतील, अशा शब्दांत त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली.

मालाड (मुंबई) येथे इमारत कोसळून ८ मुलांसह ११ जणांचा मृत्यू, ७ जण घायाळ !

मालाड येथील दुर्घटनेतील घायाळ व्यक्तींची मुख्यमंत्र्यांकडून विचारपूस, मृतांच्या कुटुंबियांसाठी शासनाकडून ५ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य घोषित

मुंबईतील अनेक भागांत रस्त्यांवर पाणी साचून वाहतूक ठप्प, तर सखल भागांतील घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल !

पहिल्याच पावसामुळे मुंबईची झाली दूरवस्था ! रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याने रेल्वेस्थानकांवर कर्मचार्‍यांचा खोळंबा, शीव रेल्वेस्थानकाला तलावाचे स्वरूप !

मुख्यमंत्री यांची पंतप्रधानांशी भेट राजकीय तडजोडीसाठीच ! – खासदार छत्रपती उदयनराजे भोसले

भेट केवळ राजकीय तडजोडीसाठी होती, अशी टीका भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली.

संकटकालीन साहाय्यासाठी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्यात सुसंवाद असावा ! – खासदार संजय राऊत, शिवसेना

नवीन सत्तासमीकरणांचा इथे विषय येत नाही. केंद्र आणि राज्य यांच्यात संघर्ष नसावा. केंद्र सरकार राज्याचे पालक म्हणून काम करत असते. राज्यांच्या संकटकाळात पंतप्रधानांनी साहाय्य करावे, ही राज्यांची भूमिका आहे.

पंतप्रधान सर्व प्रश्‍न सकारात्मकतेने सोडवतील, अशी अपेक्षा आहे ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत झालेल्या भेटीत महाराष्ट्रातील विविध विषय मार्गी लावण्याची मुख्यमंत्र्यांची विनंती !

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पंतप्रधानांची भेट घेणार !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देहली येथे जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. ८ जून या दिवशी सकाळी ११ वाजता ही भेट होणार आहे

कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी आशासेविकांचे काम अधिक ! – मुख्यमंत्री

आतापर्यंत तुम्ही पुष्कळ काम केले आहे, तसेच घरोघरी जाऊन पहाणी-तपासणी केली आहे. तुम्ही सर्वांनी महाराष्ट्राला ‘कुटुंब’ म्हणून तळहाताच्या फोडासारखे जपले आहे. मुख्यमंत्र्यांचे ‘ऑनलाईन’ संवादाद्वारे आशासेविकांना आवाहन !

मुंबईसह कोकणात ९ ते १२ जून या काळात अतीवृष्टीची चेतावणी !

मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये ९ ते १२ जून या काळात अतीवृष्टी होणार असल्याची चेतावणी हवामान खात्याने दिली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने मुंबई महानगर क्षेत्र आणि  कोकणातील सर्व जिल्ह्यांतील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा यांची आढावा बैठक घेतली.

राज्य सरकारला मराठा आरक्षणाविषयी सर्वोच्च न्यायालयात मुद्दे मांडता न आल्याने आरक्षण मिळाले नाही ! – खासदार नारायण राणे यांची टीका 

शिवसेनेने आरक्षणाला कधीही पाठिंबा दिला नाही; कारण त्यांना आरक्षण द्यायचे नव्हते.