भिंड (मध्यप्रदेश) येथे पोलिसांच्या वाहनांतील २५० डिझेलची चोरी करणारे २ पोलीस निलंबित

कामावर अनुपस्थित असणारे अन्य ३ पोलीसही निलंबित

भिंड (मध्यप्रदेश) – येथे पोलिसांनी त्यांच्याच वाहनातील २५० लिटर डीझेलची चोरी केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी दोघा पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे, तर अन्य तिघांना अनुपस्थितत राहिल्याने निलंबित करण्यात आले आहे. रात्रीच्या गस्तीसाठी किंवा अन्य कामांसाठी पोलिसांच्या वाहनांमध्ये डिझेल भरून ठेवण्यात आलेले असते. २९ नोव्हेंबरला रात्री ६ वाहनांमध्ये डिझेल भरून ठेवण्यात आले होते. रात्रीच्या वेळी चालक पोलीस संदीप जाटव आणि अभिनेंद्रसिंह सिकरवार यांनी या वाहनांतील डिझेलची चोरी केली.

चौकशीत या दोघांची नावे समोर आल्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. तसेच रात्रीच्या या दोघांकडून डिझेलची चोरी होत असतांना अन्य ३ पोलीस शिवा शर्मा, उमेश आणि सुल्तान सिंह दुसरीकडे मेजवानी करत होते. त्यामुळे त्यांनाही निलंबित करण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका

अशांना निलंबित नाही, तर सेवेतून बडतर्फ करून कारागृहात डांबले पाहिजे !