ए.टी.एम्.मधून पैसे चोरणार्‍या हरियाणा येथील ३ धर्मांधांना सोलापूर पोलिसांनी पकडले !

ए.टी.एम्.मधून पैसे चोरणार्‍या हरियाणा येथील ३ धर्मांधांना सोलापूर पोलिसांनी पकडले

सोलापूर – येथील ‘हिताची पेमेंट्स सव्र्हिसेस प्रा.लि. आस्थापना’च्या ए.टी.एम्.मधून १० लाख रुपयांची चोरी करणार्‍या धर्मांधांना फौजदार चावडी पोलिसांनी कह्यात घेतले आहे. राहुल खान, महंमद असीम खान आणि महंमद सलिम खान अशी धर्मांधांची नावे आहेत. या तिघांकडून पोलिसांनी १ चारचाकी वाहन, १२ ए.टी.एम्. कार्ड आणि ३० सहस्र रुपये रोख रक्कम जप्त केली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील आणि विकास देशमुख यांनी दिली. (किफायतशीरपणे चोरी करणार्‍या धर्मांधांची कसून चौकशी होऊन त्यांना कठोर शिक्षा व्हायला हवे ! – संपादक)

१. ऑक्टोबरमध्ये हे तीनही संशयित सोलापूर येथे आले होते. त्यांनी शहरातील बसस्थानकाच्या परिसरातील ए.टी.एम्.मधून तेथील विद्युत् पुरवठा खंडित करून पैसे काढून घेतले होते. गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलिसांनी संशयित आरोपींचा शोध चालू केला.

२. शिवाजी चौकातील ए.टी.एम्.मध्ये ७ ‘डेबिट कार्ड’ वापरून त्या तिघांनी १ लाख ९९ सहस्र रुपये लंपास केले होते, तसेच शहरातील विविध भागांतील ए.टी.एम्.मधून चोरट्यांनी ५ लाख ९९ सहस्र २०० रुपये लंपास केले होते.

३. हरियाणाचे हे तिघे जण प्रत्येक २ मासांनी सोलापूर येथे येऊन वीजपुरवठा खंडित करून ए.टी.एम्.मधून पैसे काढत असत. पैसे काढल्याची नोंद होत नसे, तसेच ज्यांच्या खात्यावरील पैसे काढले त्यांच्या खात्यावरील पैसे आहे तेवढेच दिसत होते.

संपादकीय भूमिका

प्रत्येक गुन्ह्यात धर्मांध सापडतात, यावरून धर्मांधांची वृत्ती कशी आहे, हे समजते !