भिवंडी येथे ‘ए.टी.एम्.’ यंत्र फोडल्याप्रकरणी गुन्हा नोंद !

भिवंडी येथील पूर्णा परिसरातील एका खासगी अधिकोषाचे ‘ए.टी.एम्.’ यंत्र गॅस कटरच्या साहाय्याने फोडण्यात आले. चोरांनी किती रक्कम चोरली, याचा आकडा समजलेला नाही. या प्रकरणी नारपोली पोलीस ठाणे येथे चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मांढरदेव (सातारा) येथील काळूबाई मंदिरात रक्कम मोजणार्‍या निवृत्त बँक कर्मचार्‍यानेच चोरले दीड लाख रुपये आणि दागिने !

भाविकांनी श्रद्धेने मंदिरात अर्पण केलेल्या धनाचा अपहार होणे, हे लज्जास्पद आहे. ही स्थिती पालटण्यासाठी मंदिरे भक्तांच्याच कह्यात असायला हवीत, तसेच दोषींवर त्वरित कठोर कारवाई करायला हवी !

लांजा तालुक्यातील केदारलिंग आणि गांगेश्‍वर मंदिरांतील दानपेटी फोडल्या

तालुक्यातील आरगाव गावचे ग्रामदैवत केदारलिंग आणि देवमळा येथील गांगेश्‍वर दानपेटी फोडून अनुमाने ३ सहस्र ५०० रुपयांची चोरी करण्यात आली आहे. अज्ञाताच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

भिंड (मध्यप्रदेश) येथे पोलिसांच्या वाहनांतील २५० डिझेलची चोरी करणारे २ पोलीस निलंबित

अशांना निलंबित नाही, तर सेवेतून बडतर्फ करून कारागृहात डांबले पाहिजे !

चोरीचा माल सापडलेल्या १४ दुकानांवर कारवाई !

जिल्ह्यातील शेतीची अवजारे आणि विद्युत् जनित्रामधील सुटे भाग यांच्या चोरीची प्रकरणे वाढली. त्यामुळे जिल्हा ग्रामीण पोलिसांनी भंगाराच्या १२४ दुकानांची पडताळणी केली. त्यात नांदगाव खंडेश्वर येथील फिरोज खान यांच्या भंगार दुकानात पोलीस तक्रारीप्रमाणे शेतीचा माल मिळाला.

वाहनांची चोरी करणार्‍याला नालासोपारा पोलिसांकडून अटक

दुचाकी आणि रिक्शा यांची चोरी करणार्‍या संजय यादव या आरोपीला नालासोपारा गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून पोलिसांनी ७ गुन्ह्यांची उकल करून चोरीच्या ४ दुचाकी आणि ३ रिक्शा हस्तगत करण्यात आल्या आहेत…

पेढी (जिल्हा यवतमाळ) येथे गोवंशियांच्या तस्करीचे प्रमाण वाढले !

तालुक्यातील पेढी हे गाव गोवंशियांच्या तस्करीचे केंद्र झाले आहे. येथून गायी आणि बैल यांना निर्दयीपणे कोंबून भाग्यनगर येथे कत्तलीसाठी त्यांची तस्करी केली जाते.

कल्याण, वसई आणि वाशी येथे एकाच दिवशी ४०३ वीजचोरांवर कारवाई !

वीजचोरांना कोणती कठोर शिक्षा देण्यात येणार आहे, हेही सांगितल्यास वीजचोरीला आळा बसेल !

कल्याण-डोंबिवलीतील वाढत्या चोर्‍या आणि घरफोड्या यांमुळे नागरिक त्रस्त !

कल्याण-डोंबिवली परिसरात गेल्या काही मासांपासून सोनसाखळी चोरी आणि घरफोडी यांचे प्रमाण वाढले आहे. दिवसाढवळ्या हे प्रकार होत आहेत. त्यामुळे ‘पोलिसांनी गस्त वाढवून गुन्हेगारीवर वचक बसवावा’, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

घरगुती गॅस सिलिंडरवर आता दिसणार ‘क्यूआर् कोड’ !

चोरी रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय : आतापर्यंत २० सहस्र गॅस सिलिंडर्सना ‘क्यूआर् कोड’ लावण्यात आला आहे. पुढील काही मासांत १४.२ किलो वजनाचे सर्व घरगुती गॅस सिलिंडर्स क्यूआर कोडशी जोडले जातील.