नवी मुंबई, २९ सप्टेंबर (वार्ता.) – मालाची वाहतूक करणारा अॅपे टेंपो चोरणार्या ३ धर्मांधांच्या टोळीला नवी मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. (अल्पसंख्यांक म्हणून प्रत्येक वेळी सहानुभूती मिळवणारे धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य ! – संपादक)
अन्वर रसुलखान पठाण, मन्नन अब्दुल शेख, फिरोज मुक्करम शेख अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. गेल्या काही मासांपासून नवी मुंबई परिसरातून ‘अॅपे’ या तीनचाकी टेंपोच्या चोरीचे प्रमाण वाढले होते. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी विविध ठिकाणी धाडी घालून ८ लाख ४४ सहस्र रुपयांचा ऐवज कह्यात घेतला आहे. यामध्ये १० अॅपे टेंपो, एक दुचाकी आणि एक टेंपोचे इंजिन यांचा समावेश आहे.