दानपेटीत लाखो रुपये असल्याची शक्यता

नंदुरबार – दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणार्या प्रकाशा येथील मुख्य केदारेश्वर मंदिराच्या गाभार्यातील दानपेटी चोरीला गेली आहे. मंदिराच्या मागील बाजूस अनुमाने दीड ते दोन किलोमीटर अंतरावर ती फेकली असल्याचे आढळून आले. दानपेटीतील रकमेविषयी माहिती मिळालेली नाही. महाशिवरात्रीनंतर दानपेटी उघडण्यात आली नव्हती. त्यामुळे त्यात लाखो रुपयांचे अर्पण गोळा झाल्याचे म्हटले जात आहे.
केदारेश्वरच्या मुख्य मंदिराला तीन दरवाजे आहेत. दोन समोरून, तर एक उजव्या बाजूने आहे. उजव्या बाजूच्या लहान दरवाज्यातून चोरांनी कुलूप तोडत सभामंडपात प्रवेश केला. यानंतर त्यांनी नंदीच्या मागील बाजूस असलेली आणि लोखंडी साखळीने बांधलेली ४५ ते ५० किलो वजनाची लोखंडी दानपेटी चोरली. या वेळी त्यांनी मंदिराबाहेरील सीसीटीव्ही कॅमेरेही फोडले. मंदिर समितीचे सुरेश पाटील यांनी याविषयी पोलिसांना माहिती दिली.
संपादकीय भूमिकाभाजपच्या राज्यातही हिंदूंची मंदिरे असुरक्षित असणे अपेक्षित नाही ! चोरांचा तात्काळ शोध घेऊन त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे ! |