सिंधुदुर्गातील भारतातील एकमेव ‘शिवराजेश्वर’ मंदिरासाठीच्या भत्त्यात वाढ करावी !
‘शिवराजेश्वर’ मंदिरासाठी सरकारकडून प्रतीमासाला केवळ २५० रुपये इतका तुटपूंजा भत्ता दिला जात आहे. या भत्त्यामध्ये वाढ करण्यात यावी, यासाठी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सनील घनवट यांनी येथील शिवसेना आमदार श्री. वैभव नाईक यांना निवेदन दिले.