जगन्नाथ पुरी प्रदक्षिणा प्रकल्पाच्या विरोधातील याचिका फेटाळली

नवी देहली – ओडिशामधील प्रसिद्ध जगन्नाथ पुरी मंदिर येथे ओडिशा सरकारकडून चालू असलेले प्रदक्षिणा प्रकल्पाला विरोध करत ओडिशा उच्च न्यायालयाने या प्रकल्पाच्या बाजूने दिलेल्या आदेशाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच फेटाळून लावली. सर्वोच्च न्यायालयाने निकालात म्हटले आहे की, अशा याचिका प्रविष्ट करणे, म्हणजे न्यायव्यवस्थेचा वेळ वाया घालवणे आहे. या प्रकरणी न्यायालयाने याचिकाकर्त्यांना १ लाख रुपयांचा दंडही ठोठावला. भाविकांना सार्वजनिक सुविधा पुरविणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

ओडिशा सरकार अवैध निर्मितीकार्य करत असल्याने मंदिराला धोका निर्माण होत आहे, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता.