लक्ष्मणपुरी येथील ‘टीलेवाली मस्जिद’ हे महादेवाचे मंदिर असल्याने हिंदूंकडे सोपवा ! – हिंदूंची न्यायालयात मागणी

जिल्हा न्यायालयाकडून खालील न्यायालयात जाण्याचा आदेश !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – येथील ‘टीलेवाली मस्जिद’ हे मूळचे शेषनाग टीलेश्‍वर महादेवाचे मंदिर आहे. त्यामुळे या मशिदीचे सर्वेक्षण करून ते हिंदूंचे मंदिर असल्याने ते हिंदूंना सोपवण्यात यावे, अशी याचिका हिंदुत्वनिष्ठांनी लखनऊ जिल्हा न्यायालयात प्रविष्ट केली. यावर जिल्हा न्यायालयाने याचिकाकर्त्यांना खालील न्यायालयात जाण्याचा आदेश दिला; कारण मूळ प्रकरण वर्ष २०१३ पासून खालच्या न्यायालयात चालू आहे.

टीलेवाली मस्जिद परिसरात असलेले शेषनाग टीलेश्‍वर समवेत अन्य देवतांची मंदिरे नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यातून तेथील धार्मिक स्थिती पालटण्याचा प्रयत्न होत आहे, असे हिंदुत्वनिष्ठांचे म्हणणे आहे. काशी येथील ज्ञानवापी मशीद आणि मथुरा येथील शाही ईदगाह मशीद यांच्या विरोधात हिंदु पक्षाचे पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन म्हणाले की, औरंगजेबाने शेषनाग टीलेश्‍वर महादेवाच्या मंदिराचा विध्वंस करून तेथे मशीद उभारली.

संपादकीय भूमिका

अशी एकेक मशीद म्हणजे पूर्वीचे हिंदूंचे मंदिर असल्याचे सांगून न्याय मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे वाया घालवण्यापेक्षा केंद्र सरकारनेच सर्व मशिदींचे सर्वेक्षण करण्यासाठी कायदा करावा, असेच हिंदूंना वाटते !