पिंपरी येथील गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक निलंबित !
गंभीर गुन्ह्यातील तपासात अधिकार्यांनी हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी या दोन अधिकार्यांना निलंबित केले.
गंभीर गुन्ह्यातील तपासात अधिकार्यांनी हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी या दोन अधिकार्यांना निलंबित केले.
कोरोना महामारीच्या काळात नागरिक ‘ऑनलाईन’ खरेदीवर भर देतांना दिसत आहेत; मात्र या प्रकारात नागरिकांची फसवणूक होण्याच्या प्रकारांतही शहरात वाढ झाली असून मागील ११ मासांत पुण्यातील अडीच सहस्र नागरिकांची ऑनलाईन खरेदी-विक्री करतांना फसवणूक झाली आहे.
रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठे यांचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही, त्यामुळे पोलिसांनी आता त्यांच्याशी संबंधित आणि कार्यालयीन सहकार्यांकडेही चौकशी चालू केली आहे.
शिवसेना नेत्या नीलम गोर्हे यांची उपसभापतिपदी झालेली नियुक्ती कायदेशीर कि बेकायदेशीर याचा निर्णय ७ जानेवारीला देणार असल्याचे खंडपिठाने स्पष्ट केले.
सर्व नगरसेवकांनी भाजपला मदत केली म्हणून काँग्रेस पक्षाने त्यांना नोटीस दिली
हिंदूंच्या प्रथा-परंपरांच्या वेळी कोल्हाकुई करणारे पुरोगामी आणि अंनिसवाले याविषयी का बोलत नाहीत ? सातत्याने केवळ हिंदु धर्माला लक्ष्य करणार्या या पुरोगाम्यांचा बेगडीपणा ओळखा !
नाताळ आणि ख्रिस्ती नववर्षारंभ निमित्ताने गड, किल्ले यांसारख्या ठिकाणी मद्य पार्ट्यांचे आयोजन केले जाते. हे अपप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने सर्व हिंदुत्वनिष्ठांच्या वतीने पोलीस आणि प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
सिक्कीममध्ये भारत-चीन सीमेजवळ लष्करी वाहन दरीत कोसळून अपघात झाला. या अपघातामध्ये जिल्ह्यातील चिंचणेर-निंब गावातील सैनिक सुजित कीर्दत यांना वीर मरण प्राप्त झाले.
गोव्यात ‘जनता कर्फ्यू’ लादण्याचा शासनाचा विचार नाही, तसेच या अनुषंगाने केंद्रीय गृहमंत्रालयाकडूनही काही विशेष सूचना आलेल्या नाहीत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
तिलारी धरण, अरुणा धरण प्रकल्प या सर्व ठिकाणच्या प्रकल्पबाधितांचे प्रश्न गेली कित्येक वर्षे सुटलेले नाहीत, तर ५ वर्षांमागील प्रकल्पबाधितांचे प्रश्न काय सुटणार ?