कॉलसेंटरमध्ये नोकरी देण्याच्या नावाखाली शेकडो युवकांची फसवणूक
कॉलसेंटरमध्ये नोकरी आहे, अशी जाहिरात देऊन शेकडो युवकांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाणे येथे कैलास भारत कसबे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कॉलसेंटरमध्ये नोकरी आहे, अशी जाहिरात देऊन शेकडो युवकांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाणे येथे कैलास भारत कसबे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
भीमा नदीपात्रातील २८ मोर्यांच्या रेल्वे पुलाजवळ भगवान शंकराचे मुख असलेली अनुमाने १५० वर्षांपूर्वीची दगडी मूर्ती खोदकाम करतांना सापडली आहे. या मूर्तीचा तोंडवळा ५ फूट असून तिचे वजन १ टनापर्यंत आहे.
आदिवासींचे धर्मांतर रोखणार्या आदिवासी विकास परिषदेच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन ! हिंदूंचे धर्मांतर करणार्या धूर्त ख्रिस्त्यांवर कारवाई होईपर्यंत हिंदूंनी सरकारचा पाठपुरावा करावा ! सरकारनेही राष्ट्रीय पातळीवर कठोर कायदा केला पाहिजे !
‘वर्षभर आम्ही तुमचे ऐकले, आता १ दिवस आमचे ऐका. नागरिकांना ३१ डिसेंबरला नववर्षाचे स्वागत करू द्या’, अशी विनंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
भाजपच्या विरोधात बोलणार्यांच्या मागे अंमलबजावणी संचालनालयाची चौकशी लावली जाते.=अनिल देशमुख
३१ डिसेंबरच्या निमित्त ऐतिहासिक गड-किल्ल्यांच्या ठिकाणी होणार्या मेजवान्या आणि सार्वजनिक मद्यपान, धूम्रपान यांवर प्रतिबंध आणावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आली. त्याविषयी नांदेड येथील उपजिल्हाधिकारी श्री. प्रदीप कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले.
वर्ष २०२० हे सर्वांसाठीच अडचणीचे ठरले आहे. आता नव्या वर्षाच्या आगमनापूर्वी आईचे दर्शन घेतले आहे. जेव्हा कधी ऊर्जेची आवश्यकता असते, तेव्हा आशीर्वाद आवश्यक असतो, त्या वेळी आशीर्वाद घेण्यासाठी मी येतो, असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.
श्री दत्त संस्थान, माहूरगड यांच्या वतीने पारंपरिक दत्तजयंती सोहळा या वर्षी कोरोनाच्या साथीमुळे रहित करण्यात आला आहे. यात्रेला येणार्या भाविकांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून श्री दत्त संस्थानच्या विश्वस्तांनी हा निर्णय घेतला आहे.
३ दिवसांच्या सलग सुट्ट्यांच्या कालावधीत शनिशिंगणापूर मंदिर परिसरात पुष्कळ गर्दी होती. नाताळला प्राधान्य न देता ७० सहस्रांहून अधिक हिंदु भाविकांनी आनंदाने शनिदर्शन घेतले. सकाळी आठ वाजता चालू झालेला दर्शनाचा ओघ रात्री उशिरापर्यंत टिकून होता.
बँकेकडून कर्जासाठी राज्य सरकारकडून हमी मिळत नसल्याने प्रस्ताव रखडला