३१ डिसेंबरच्या अपप्रकारांच्या विरोधात नांदेड येथे उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांना निवेदन

नांदेड – ३१ डिसेंबरच्या निमित्त ऐतिहासिक गड-किल्ल्यांच्या ठिकाणी होणार्‍या मेजवान्या आणि सार्वजनिक मद्यपान, धूम्रपान यांवर प्रतिबंध आणावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आली. त्याविषयी नांदेड येथील उपजिल्हाधिकारी श्री. प्रदीप कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, सद्यस्थितीत कोरोनाच्या प्रसाराची भीती कायम असून दुसरी लाट येण्याची शक्यता सांगितली जात आहे. गड-किल्ले, ऐतिहासिक ठिकाणे किंवा पर्यटनस्थळी गर्दी करण्यावर आणि मेजवान्या करण्यावर बंदी घालणारा आदेश काढावा. निवेदन देते वेळी नांदेड येथील धर्मप्रेमी सर्वश्री पुरभाजी तिडके, राम वाघमारे, नागेश बुंदेले, हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सर्वश्री गणेश कोंडलवार, बजरंग रघोजीवार उपस्थित होते.