तुलिंज (जिल्हा पालघर) पोलीस ठाण्यातील हवालदाराची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

मानसिकदृष्ट्या स्वतःच खचलेले असे पोलीस जनतेचे रक्षण कसे करणार ?

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाच्या कुलगुरूंवर भ्रष्टाचाराचे आरोप

कुलगुरु डॉ. उद्धव भोसले यांनी विद्यापिठातील कामात घोटाळा केल्याचा आणि चारचाकी वाहनांच्या ‘व्हीआयपी’ क्रमांकासाठी सहस्रो रुपये मोजले असल्याचा आरोप सिनेट सदस्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

पुणे येथे पोलीस कर्मचार्‍याच्या मुलीचे अपहरण करून अत्याचार

पोलीस कर्मचार्‍यांच्याच मुली सुरक्षित नसतील, तेथे सर्वसामान्यांच्या मुलींच्या सुरक्षेची काय स्थिती असेल ?

‘आता तुमचे हिंदुत्व कुठे गेले ?’ – गोव्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना शिवसेनेचा प्रश्‍न

गोव्यात गोमांसाचा तुटवडा दूर करण्यासाठी भाजप शासनाने अल्पसंख्यांकांची मागणी मान्य केल्याचे प्रकरण !

उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी तिघांना पोलीस कोठडी

अवैध मद्याची वाहतूक करतांना उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष कृतीदलाचे निरीक्षक पांडुरंग पाटील यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी बांदा पोलिसांनी २२ डिसेंबरला सावंतवाडी येथील तिघांना अटक केली होती.

कुंकळ्ळीतील महानायकांच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास पाठ्यपुस्तकात अंतर्भूत करा ! – भारतमाता की जय

१५ जुलै हा दिवस कुंकळ्ळी हुतात्मा दिन म्हणून घोषित करणे, कुंकळ्ळीच्या लढ्यावर चित्रपट बनवणे आणि महानायक हुतात्मा स्मारकाचे विस्तारीकरण अन् सुशोभिकरण करून त्याच्या कायमस्वरूपी देखभालीची व्यवस्था करणे, अशा मागण्या सरकारने पूर्ण कराव्यात, असे आवाहन प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांनी केले.

सिंधुदुर्गातील कोरोनाची सद्य:स्थिती

भाजपचे प्रदेश चिटणीस माजी आमदार प्रमोद जठार, त्यांचा वाहनचालक आणि अन्य एक अशा तिघांचा कोरोनाविषयीचा अहवाल सकारात्मक आला आहे. जठार हे त्यांच्या कासार्डे येथील घरी गृहअलगीकरणात आहेत.

गोवा मुक्तीलढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांची तैलचित्रे विधानसभेत लावा !

सत्तरी इतिहास संवर्धन समितीची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे मागणी

पालिका निवडणुकीच्या ३ आठवड्यांपूर्वी आरक्षण सूची घोषित करण्याचा न्यायालयाचा शासनाला आदेश

राज्यातील नगरपालिकांच्या निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध होण्याच्या ३ आठवड्यांपूर्वी प्रभागांच्या आरक्षणाविषयी सूची घोषित करणार असल्याची माहिती गोवा शासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाला दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने शासनाचे हे म्हणणे मान्य केले आहे.

गोव्यातील कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा १ सहस्र

गोव्यात कोरोनाबाधितांचे प्रमाण १ सहस्रहून अल्प झाले होते. ही संख्या २३ डिसेंबरला १२५ नवीन कोरोनाबाधित आढळल्याने पुन्हा १ सहस्र झाली आहे. कोरोनामुळे दिवसभरात २ मृत्यू झाले आहेत, तर ७० रुग्ण बरे झाले आहेत.