माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना मारहाण करून त्यांच्या मैत्रिणीचा विनयभंग केल्याचा गुन्हा नोंद !

तक्रारनुसार अमन चढ्ढा, मनीष आनंद यांच्यासह सहा जणांवर सी.आर्.पी.सी. १५६ (३) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

राज्यशासनाच्या यशवंत पंचायत राज अभियानात पुणे क्षेत्रीय विभागात कोल्हापूर जिल्हा परिषद प्रथम क्रमांकावर

या अभियानातील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जिल्हा परिषद कोल्हापूरसह दोन्हीही विजेत्या पंचायत समितीचे प्रस्ताव पाठवले जाणार आहेत.

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेचे आंदोलन

पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने येथील स्टेशन चौकात आंदोलन करण्यात आले.

नागोठणे (जिल्हा रायगड) येथील सनातनचे साधक श्री. विजय (नाना) वर्तक यांचा ‘कोविड योद्धा’ म्हणून सत्कार !

मनसेचे रायगड जिल्हा समन्वयक गोवर्धन पोलसानी म्हणाले की, नाना वर्तक हे जीव तोडून हिंदु धर्माचे कार्य करत आहेत. गावात सर्वत्र ते प्रबोधनपर फलक लावतात. त्यांच्या कुटुंबियांनीही राष्ट्र-धर्मासाठी वाहून घेतले आहे.

पेण (जिल्हा रायगड) येथील सनातनच्या साधिका सौ. दीपाली दिवेकर ‘कोरोना योद्धा’ म्हणून सन्मानित !

सौ. दीपाली दिवेकर यांनी कोरोनाच्या काळामध्ये आशा स्वयंसेविका म्हणून गावपातळीवर उल्लेखनीय कामगिरी केली होती, तसेच ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या अंतर्गतही उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.

लातूर जिल्ह्यात बसस्थानकातून चोरट्यांनी एस्.टी. बस पळवली

बसस्थानकात ४ फेब्रुवारीच्या मध्यरात्री मुक्कामी असलेली बस चोराने पळवली. बसचे वाहक आणि चालक बसस्थानकात झोपले होते. बस चोरीला गेल्याचे लक्षात येताच चालकाने या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

पनवेलच्या बांधकाम व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकावणार्‍या छोट्या राजनच्या हस्तकाला पुणे येथून अटक

पनवेल येथील बांधकाम व्यावसायिक नंदू वाझेकर यांच्याकडे २५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी परमानंद हंसराज ठक्कर या छोट्या राजनच्या हस्तकाला पुण्याच्या कोंढव्यातून अटक केली आहे.

कोल्हापूर येथे चिकित्सालयातील फलकाद्वारे हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा वैशिष्ट्यपूर्ण प्रसार !

६ फेब्रुवारी या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने होणार्‍या ऑनलाईन हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा प्रचार आता वैयक्तिक संपर्क, सामाजिक प्रसारमाध्यम, विविध ठिकाणी फलकप्रसिद्धी यांद्वारे सहस्रो लोकांपर्यंत सभेचा विषय पोचवण्यात येत आहे.

हिंदुद्वेषी शरजील उस्मानी याच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा नोंद करा !

हिंदुद्वेषी शरजील उस्मानी याने हिंदु धर्म आणि समाज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याच्या विरोधात रामनवमी शोभायात्रा समिती आणि भाजप यांच्या वतीने रोष व्यक्त करून शरजील याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करावा, अशी मागणी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या एका निवेदनाद्वारे केली.

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथील महावितरणच्या पोल फॅक्टरीमध्ये आग

येथील महावितरणच्या पोल फॅक्टरीमध्ये ३ फेब्रुवारी या दिवशी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. ही घटना लोकवस्तीजवळ घडली; मात्र यामध्ये जीवितहानी झाली नाही.