मुरगाव, मडगाव, म्हापसा, सांगे आणि केपे या ५ नगरपालिकांसाठी २३ एप्रिलला निवडणूक
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज प्रविष्ट करतांना प्रत्येक उमेदवारासमवेत केवळ २ व्यक्ती कार्यालयात प्रवेश करू शकतील.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज प्रविष्ट करतांना प्रत्येक उमेदवारासमवेत केवळ २ व्यक्ती कार्यालयात प्रवेश करू शकतील.
यामध्ये कोण चुकले आहे, हे जनतेला समजले पाहिजे आणि संबंधितांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे !
माण तालुक्यातील ढाकणी येथे अनधिकृतपणे वाळू वाहतूक करणार्या वाहनावर कारवाई करणारे मंडलाधिकारी शरद सानप आणि सिद्धार्थ जावीर यांना वाळू माफियांनी जीवे मारण्याची धमकी देत मारहाण केली आहे.
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिवंगत आमदार भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांना, तर भाजपच्या वतीने समाधान अवताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
स्थावर मिळकतीविषयीच्या अभिहस्तांतरण किंवा विक्रीपत्राच्या दस्तऐवजांवर शासनाने ३१ मार्च २०२१ पर्यंत सवलत घोषित केली आहे.
गोहत्येमध्ये अग्रेसर असणारे धर्मांध ! गोहत्येच्या वारंवार घडणार्या घटना पहाता गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही करणे किती आवश्यक आहे हे लक्षात येते !
दळणवळण बंदी हा शेवटचा पर्याय आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्य सरकारला याविषयी चिंता आहे. ही रुग्णसंख्या रोखण्यासाठी जे करणे आवश्यक आहे, ते सरकारकडून केले जात आहे. संसाधनांची कमतरता पडू दिली जाणार नाही.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यशासनाचा निर्णय !
प्रभाग क्षेत्र अधिकारी भारत पाटील यांच्या तक्रारीवरून आंदोलनकर्त्या १२५ व्यापार्यांवर डोंबिवली येथील रामनगर पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. याविषयी पुढील अन्वेषण चालू आहे.
अधिकार्यांना केंद्रातील भाजप सरकारचा पाठिंबा असून त्याविना हे होऊ शकत नाही, असा आरोप काँग्रेस पक्षाच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी विरोधकांवर केला.