बांगलादेशात जिहादी संघटनेच्या पदाधिकार्‍याला अटक

पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेशाच्या दौर्‍यावर गेले असता, तिथे मोठ्या प्रमाणात हिंसाचार करण्यात आला होता. या प्रकरणी जिहादी संघटना हिफाजत-ए-इस्लामचा संयुक्त सरचिटणीस मामूनुल हक याला अटक केली.

बांगलादेशी धर्मांधांचे आव्हान !

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांत भारताने ही सावरकर नीती न अवलंबल्यामुळे हिंदूंना सर्वत्र मार खावा लागत आहे. ही स्थिती पहाता भारताने सावरकर नीती अवलंबण्याची हीच योग्य वेळ आहे !

पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त बांगलादेशच्या दौर्‍यावर !

पंतप्रधान मोदी यांचा कोरोना काळातील हा पहिलाच विदेश दौरा आहे. बांगलादेशच्या स्वातंत्र्याला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या कार्यक्रमासाठी मोदी यांना मुख्य अतिथी म्हणून बोलावण्यात आले आहे.

(म्हणे) ‘धर्माच्या नावाखाली देशात फूट पाडू दिली जाणार नाही !’ – बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे फुकाचे बोल

बांगलादेशात हिंदूंवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी शेख हसीना प्रत्यक्षात काय कृती करत आहेत ? हिंदूंचे रक्षण कसे करत आहेत ? हिंदूंच्या संघटनांना त्या कसे संरक्षण देत आहेत? हेही त्यांनी सांगायला हवे अन्यथा ही केवळ भाषणबाजीच ठरील !