सनातन धर्माची जगाला आवश्‍यकता ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

सध्‍याची जागतिक परिस्‍थिती पहाता ज्‍याची मुळे भारतात आहेत, त्‍या सनातन धर्माची जगाला आवश्‍यकता आहे, असे मत राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्‍यक्‍त केले.

२४ ते २८ जानेवारी २०२४ या कालावधीत दुर्ग श्री रायरेश्वर ते श्री प्रतापगड धारातीर्थ यात्रेचे (मोहिमेचे) आयोजन !

२४ जानेवारीला सायंकाळी ५.३० वाजता श्री तुळजाभवानीदेवीच्या आरतीने मोहिमेस प्रारंभ होईल.

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेसाठी ७६ कोटी ५१ लाख रुपयांचा निधी संमत ! – सुधीर गाडगीळ, आमदार, भाजप

केंद्रशासनाच्या भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना ‘विशेष साहाय्य योजना २०२३-२४ भाग १’ अंतर्गत विकास योजना आराखड्यातील समाविष्ट कामांना ‘निधी आणि विशेष साहाय्य योजना’, या शीर्षामधून निधी उपलब्ध झाला आहे.

लोकमान्य टिळक स्मारक मंदिराच्या शताब्दी कार्यक्रमास प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांची उपस्थिती !

शताब्दी वर्षाच्या शुभारंभप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक प.पू. डॉ. मोहनजी भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत १७ डिसेंबरला लोकमान्य टिळक स्मारक मंदिराच्या वतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सांगली बसस्थानक परिसरात गाड्या लावण्यासाठी जागा मिळणार !

या आगारात ५०० हून अधिक गाड्यांची ये-जा असते. सांगली बसस्थानक जिल्ह्याचे ठिकाण असल्याने येथे प्रवाशांची संख्या मोठी आहे.

सांगली येथे वंचित बहुजन आघाडीच्या सभेत टिपू सुलतानच्या चित्राला हार घातला !

टिपू सुलतानचे उदात्तीकरण करणारे आंबेडकर ‘धर्मांधांच्या दृष्टीने हिंदु हे काफीरच असतात’, हे लक्षात घेतील का ?

आज सांगली येथे ‘बृहत्-त्रयीरत्न वैद्यराज आ.वा. दातारशास्त्री चौक’ नामकरण सोहळा !

बृहत्-त्रयीरत्न वैद्यराज आत्मराज वामन दातारशास्त्री हे भारतातील आयुर्वेद क्षेत्रातील आदरणीय व्यक्तीमत्त्व होते. त्यांनी आयुर्वेद शास्त्रात संशोधन केले आणि त्यातून ‘पांचभौतिक चिकित्सा प्रणाली’ उदयास आली.

विनयभंगप्रकरणी उपवनसंरक्षक विजय माने निलंबित !

महिला अत्याचाराच्या अनेक प्रकरणांमध्ये संबंधित अधिकार्‍यांचे केवळ निलंबन होते. निलंबन झाले, तर ६ मास त्यांना निम्मे वेतन मिळते आणि बहुतांश अधिकारी ६ मासांनंतर परत कामावर उपस्थित होतात !

कोयना धरण पाणी अडवणूक प्रकरणी प्रसंगी त्यागपत्र ! – संजयकाका पाटील, खासदार, भाजप

सातारा जिल्ह्यातील कोयना धरणातून सांगली जिल्ह्याच्या हक्काचे पाणी देण्यात येत नाही. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे सांगलीला पाणी मिळत नाही.

२८ नोव्हेंबरपासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची ‘हिंदवी स्वराज्य यात्रा’ ! – रोहन कडोले

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकदिनाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. याचे औचित्य साधून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि दुर्गवंदन यांच्या वतीने २८ नोव्हेंबरपासून ‘हिंदवी स्वराज्य यात्रा’ आयोजित करण्यात आली आहे.