कोंगनोळी (जिल्हा सांगली) येथे अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील अक्षतांच्या मंगल यात्रेचे उत्साहात स्वागत !

ही ग्राम प्रदक्षिणा यात्रा माजी पाटबंधारे राज्यमंत्री अजितराव घोरपडे सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली ढोल वाजवत, भजने म्हणत पारंपरिक वाद्ये वाजवत पार पडली.

सांगलीच्या कारागृहात स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दी वर्षाच्या निमित्ताने त्यांना अभिवादन !

महाराष्ट्रातील सर्व कारागृहांत ६ जानेवारीपासून ‘स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दी’ साजरी होत आहे. त्या अंतर्गत सांगली येथील कारागृहात ८ जानेवारी या दिवशी त्यांना अभिवादन करण्यात आले.

सांगली येथे १ सहस्र २०० कडव्या-लढवय्या शीख तरुणांचा हिंदु एकता आंदोलन संघटनेमध्ये प्रवेश !

या वेळी शीख बांधवांनी असा निर्धार व्यक्त केला की, हिंदुत्वाची सर्व शक्ती एकवटून आम्ही लवकरच प्रभाग क्रमांक ९ मध्ये हिंदु एकता आंदोलनाची पहिली शाखा काढणार आहोत.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वि.द. बर्वे यांचा १४ जानेवारीला नागरी सत्कार !

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वि.द. बर्वे यांचा १४ जानेवारीला सांगलीकरांच्या वतीने नागरी सत्कार होत आहे. हा कार्यक्रम दुपारी ४ वाजता कृष्णा नदीकाठी माई घाटावरील स्वामी समर्थ मंदिराजवळ होईल.

‘विकसित भारत संकल्प’ यात्रेच्या रथाचे सांगली येथे आगमन !

केंद्रशासनाच्या विविध योजनांची माहिती देणारा ‘विकसित भारत संकल्प’ यात्रेचा रथ १० जानेवारीला सांगलीत आला आहे. रथाचे स्वागत सांगली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधीर गाडगीळ आणि सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका आयुक्त सुनील पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

तासगाव नगर परिषदेकडे वारंवार तक्रार अर्ज करूनही शनैश्‍वर मंदिराशेजारील स्‍वच्‍छतागृह हटवण्‍यास प्रशासन उदासीन !

परिसरात आणखी ४ स्‍वच्‍छतागृहे असल्‍याने मंदिराशेजारील स्‍वच्‍छतागृह काढून टाकावे, यासाठी श्री. गोगटे हे नगर परिषदेकडे गेली २ वर्षे पाठपुरावा करत आहेत. या संदर्भात अनेक वेळा निवेदनही देऊन झाले; मात्र ते हटवण्‍यास प्रशासन उदासीन आहे.

कोल्हापूर-सांगली पूरव्यवस्थापन प्रकल्पाला जागतिक बँकेची संमती !

३ सहस्र ३०० कोटी रुपयांच्या प्रकल्पास २ सहस्र ३२८ कोटी रुपये जागतिक बँक देणार !

मिरज-सांगली रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपूल सहापदरी होणार !

मिरज-सांगली रस्त्यावरील कृपामयी रुग्णालयाजवळील उड्डाणपूल सध्या जीर्ण झाल्याने त्याचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करण्यात आले. यात हा पूल धोकादायक असून यावरून जड वाहतूक बंद करण्याची सूचना करण्यात आली आहे.

गुन्हा घडलेल्या ‘लॉज’चा परवाना रहित करा ! – अधिवक्त्या (सौ.) स्वाती शिंदे, भाजप

सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे ३ शाळकरी अल्पवयीन मुलींच्यावर झालेल्या अत्याचार प्रकरणात भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस अधिवक्त्या (सौ.) स्वाती शिंदे यांनी साहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर आणि पीडित कुटुंबियांची भेट घेतली.

सांगली येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानद्वारे जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात निषेध आंदोलन !

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामाविषयी अश्लाघ्य वक्तव्य केल्याप्रकरणी येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने जाहीर निषेध करण्यासाठी ४ जानेवारी या दिवशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ‘जाहीर निषेध आंदोलन’ करण्यात आले.