सांगली जिल्ह्याला पाणी देण्यासाठी सातारा जिल्ह्यातील वीजपुरवठा केला खंडीत !

सांगली जिल्ह्याला पाणी देण्यासाठी सातारा जिल्ह्यातील काही गावांतील वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. अल्प पावसामुळे सातारा जिल्ह्यात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.

सांगलीच्या अपर पोलीस अधीक्षकपदी रितू खोकर यांची नियुक्ती ! 

जिल्ह्याच्या रिक्त असलेल्या अपर पोलीस अधीक्षकपदी श्रीमती रितू खोकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीमती रितू या वर्ष २०१८ च्या ‘बॅच’च्या ‘आय.पी.एस्.’ अधिकारी आहेत.

क्रूरकर्मा धर्मांध टिपू सुलतानची जयंती साजरी करण्‍यावर बंदी घाला ! – सांगली आणि कोल्‍हापूर जिल्‍ह्यांत निवेदन सादर

क्रूरकर्मा धर्मांध टिपू सुलतानची जयंती साजरी करण्‍यावर बंदी घालावी, या मागणीचे निवेदन कोल्‍हापूर शहर, सांगली शहर, तसेच ईश्‍वरपूर येथे देण्‍यात आले. 

लाच घेतांना नायब तहसीलदार कह्यात !

भूमीची अकृषक आकारणी करून गुंठेवारी नियमानुकूल आदेश देण्‍यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार सुनील चव्‍हाण यांच्‍यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत कह्यात घेतले.

राष्‍ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाच्‍या अध्‍यक्षा डॉ. दिव्‍या गुप्‍ता सांगलीत येणार

राष्‍ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाच्‍या अध्‍यक्षा डॉ. दिव्‍या गुप्‍ता २२ नोव्‍हेंबरला सांगलीत येणार आहेत. त्‍या दिवशी सांगलीतील विविध सामाजिक संघटनांमध्‍ये काम करणार्‍या महिलांशी संवाद साधून त्‍या मार्गदर्शन करणार आहेत

सांगली जिल्‍ह्यात गेल्‍या ५ वर्षांत ३१ विभागांतील १५२ जणांना लाचखोरीच्‍या प्रकरणी अटक !

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सांगली जिल्‍ह्यात गेल्‍या ५ वर्षांत ३१ विभागांतील १५२ जणांना लाचखोरीप्रकरणी अटक केली आहे. सर्व विभागांत लाच घेण्‍यात महसूल विभाग आघाडीवर असून यातील ५२ जणांना अटक करण्‍यात आली होती.

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेकडून ‘रात्र स्‍वच्‍छता मोहिमे’त २८१ टन कचरा संकलित !

महापालिका आयुक्‍त तथा प्रशासक सुनील पवार यांच्‍या नियोजनानुसार आणि उपायुक्‍त राहुल रोकडे, उपायुक्‍त वैभव साबळे आणि उपायुक्‍त स्‍मृती पाटील यांच्‍या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम पार पडली.

अमली पदार्थ सेवन विरोधात महाविद्यालय स्‍तरावर जनजागृती करा ! – डॉ. राजा दयानिधी, जिल्‍हाधिकारी, सांगली

शैक्षणिक अभ्‍यासक्रमात धर्मशिक्षणाचा अंतर्भाव करून विद्यार्थ्‍यांना धर्माचरण आणि साधना करायला शिकवणे आवश्‍यक आहे. अशा प्रकारची जनजागृती झाल्‍यासच खर्‍या अर्थाने विद्यार्थी सर्वांगाने घडतील !

वसुबारसनिमित्त कोल्‍हापूर येथील गोरक्षनाथ मठात गोपूजन आणि होम !

वसुबारस या दिवशी शिवाजी पेठ येथील गोरक्षनाथ मठ येथे गोपूजन आणि होम यांचे आयोजन करण्‍यात आले होते. सर्वप्रथम गणेश पूजन करून गोपूजा करण्‍यात आली. तसेच काही ठिकाणी विविध संघटनांच्‍या वतीने गोवत्‍स पूजन करण्‍यात आले.

सांगली जिल्‍ह्यातील ४ तालुक्‍यांत मध्‍यम स्‍वरूपाचा दुष्‍काळ घोषित !

सांगली जिल्‍ह्यातील शिराळा, कडेगाव, खानापूर-विटा, मिरज या ४ तालुक्‍यांमध्‍ये मध्‍यम स्‍वरूपाचा दुष्‍काळ घोषित केला आहे. या तालुक्‍यात शासनाने संमत केलेल्‍या विविध सवलती लागू करण्‍याविषयीचा आदेश जिल्‍हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी निर्गमित केला आहे.