सांगली – श्रीराममंदिर परिसरात असलेल्या जैन कच्छी भवन येथे हिंदु एकता आंदोलनाच्या वतीने ९ एप्रिलला सायंकाळी ५ वाजता हिंदूंचा भव्य मेळावा आयोजन करण्यात आला आहे. या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष श्री. नितीन शिंदे, सातारा जिल्हाध्यक्ष श्री. विक्रम पावसकर यांचे मार्गदर्शन होणार आहे. राष्ट्रहितासाठी समान नागरी कायदा झाला पाहिजे, संसदेत कायदा करून भारत हिंदु राष्ट्र घोषित झाले पाहिजे, वाढती मशिदींची संख्या आणि त्यांच्यासाठी येणारा विदेशातून निधी यांची चौकशी झाली पाहिजे, मशिंदींवरील अवैध भोंगे बंद झाले पाहिजेत, हिंदूंच्या भूमीवर अवैधरित्या आक्रमण करून हिंदूंना हुसकावून लावणे बंद झाले पाहिजे, गड-दुर्गांवरील अवैध अतिक्रमण भुईसपाट झाले पाहिजे, हिंदूंवर वारंवार होणारे आक्रमण अन् त्यांच्या भूमीवर अवैधरित्या अतिक्रमण करून हिंदूंना हुसकावून लावणे बंद झालेच पाहिजे, या तसेच अन्य प्रमुख मागण्या यात केल्या जाणार आहेत. तरी हिंदूंनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन श्री. नितीन शिंदे यांनी केले आहे.