शॉर्ट सर्किटमुळे गोठा, घर जळले : ३ गोवंशियांचा मृत्यू !

सांगली – मिरज तालुक्यातील भोसे येथील देवेंद्र बापू चौगुले यांच्या गोठ्याशेजारी असलेल्या खांबावर शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याने त्यांचे कौलारू घर आणि गोठा जळून खाक झाला. या वेळी गोठ्यात बांधलेल्या ३ गोवशियांचा होरपळून मृत्यू झाला, तर आगीत ५ लाख रुपयांची हानी झाली. घटनास्थळी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी भेट देऊन चौगुले कुटुंबियांना धीर दिला आणि ‘जे काही शासकीय साहाय्य करता येईल ते करू’, असे आश्वासन दिले.