सांगली येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या मुसलमानास १० वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा !

प्रतीकात्मक छायाचित्र

सांगली, ३० एप्रिल (वार्ता.) – वानलेसवाडी येथील आसीत रमजान मुजावर (वय २२ वर्षे) याने अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी येथील सांगली जिल्हा आणि सत्र न्यायाधीश डी.एस्. हातरोटे यांनी आरोपी मुजावर याला या प्रकरणी दोषी धरून १० वर्षे सश्रम कारावास अन् २० सहस्र रुपये दंड अशी शिक्षा २९ एप्रिल या दिवशी सुनावली. या खटल्याचे काम जिल्हा सरकारी अधिवक्त्या श्रीमती आरती देशपांडे-साटविलकर यांनी पाहिले.

१. पीडित मुलीच्या आईने पीडित मुलगी हरवल्याची तक्रार विश्रामबाग पोलीस ठाण्यात केली होती. त्यानंतर पोलिसांनी पीडित मुलीला शोधले.

२. मुलीला आरोपी मुजावर याने फूस लावून पळवून नेऊन पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे एका घरी ठेवून तेथे अत्याचार केल्याचे मुलीने सांगितले.

३. पोलीस उपअधीक्षक अशोक विरकर यांनी अन्वेषण करून न्यायालयात दोषारोपपत्र प्रविष्ट केले. सरकार पक्षाच्या वतीने एकूण ९ साक्षीदार पडताळण्यात आले.

४. शिक्षेच्या सूत्रावर सरकारी अधिवक्त्यांनी आरोपीला अधिकाधिक शिक्षा देण्यात यावी, तसेच दंडाची रक्कम पीडितेला देण्यात यावी, अशी विनंती केली होती.

संपादकीय भूमिका

या शिक्षेने मुलीच्या आयुष्याची झालेली हानी का भरून येईल ?

हिंदूंनो, तुमच्या मुलींना धर्मांधांच्या अत्याचारांपासून रोखण्यासाठी शासनाला लव्ह जिहादचा कायदा करण्याची मागणी करा !