वेलणकर आयुर्वेदिक औषध दुकानाचे संचालक रमेश वेलणकर यांचे निधन !

सांगली – सांगली येथील वेलणकर आयुर्वेदिक औषध दुकानाचे संचालक रमेश वेलणकर (वय ७९ वर्षे) यांचे रुग्णाईत असल्याने २८ एप्रिलला निधन झाले. रमेश वेलणकर हे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते श्री. राम वेलणकर यांचे वडील होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन सुना, एक मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रमेश वेलणकर हे दैनिक ‘सनातन प्रभात’चे नियमित वाचक होते. सनातन परिवार वेलणकर कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.