सांगली, २ मे (वार्ता.) – उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची १ मे या दिवशी येथे जाहीर सभा आयोजित केली होती. या सभेच्या पार्श्वभूमीवर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी योगी आदित्यनाथ यांची येथे सदिच्छा भेट घेतली. योगी आदित्यनाथ यांच्या सभेला ते धारकर्यांसह उपस्थित होते. यापूर्वी पू. भिडेगुरुजी यांनी २७ एप्रिल या दिवशी कोल्हापूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली होती.