‘सर्व काही देवच करवून घेतो’, या भावात असणारे आणि कुटुंबियांना साधना करण्यास प्रोत्साहन देणारे सनातनचे संत पू. बलभीम येळेगावकरआजोबा !
गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या संतांविषयी लिखाण प्रकाशित करत आहोत. आज आपण सनातनचे ८२ वे संत पू. बलभीम येळेगावकरआजोबा यांची त्यांच्या सुनेला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पाहूया.