प्रीतीस्वरूप आणि साधकांना आधार देणार्‍या सनातनच्या ९५ व्या व्यष्टी संत पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी (वय ८३ वर्षे) !

पू. आजी साधकांसाठी नामजप करत असतांना त्यांना देवतांचे दर्शन होते. पू. आजींना कधी सिंहासनाधिष्ठित श्रीराम, तर कधी कैलासपती शिव, तर कधी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे दर्शन होते.

श्री. प्रकाश मराठे यांचा सनातनच्या संतांप्रती असलेला भाव !

‘संतांप्रती भाव कसा असायला पाहिजे ?’, हे मला मराठेकाकांकडून शिकायला मिळाले. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी मराठेकाकांसारखे कितीतरी साधक निर्माण केले आहेत’, हे जाणवून मला सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांविषयी कृतज्ञता वाटली.’

प्रेमभाव आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेल्या फोंडा, गोवा येथील सनातनच्या संत पू. (श्रीमती) सुधा सिंगबाळ !

संत हे ईश्वराचे सगुण रूप आहेत. अशा या सगुण रूपातील संतांमध्ये अनेक गुण असतात. अशाच एक संत म्हणजे सनातनच्या संत पू. (श्रीमती) सुधा सिंगबाळआजी !

सेवेची तीव्र तळमळ असलेल्या ६६ टक्के आध्यात्मिक पातळी असणार्‍या देवद आश्रमातील सौ. लक्ष्मी नारायण पाटील !

पू. (सौ.) अश्विनी अतुल पवार यांना सौ. लक्ष्मी नारायण पाटील (पूर्वाश्रमीच्या कु. सोनाली गायकवाड) यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

पू. अश्विनीताई आहेत आमची माऊली ।

पू. ताई आहेत निरपेक्ष प्रीतीचा झरा ।
त्यांच्या छत्रछायेखाली अखंड मिळावा आम्हा आसरा ।।

अध्यात्मातील अधिकारी असूनही सर्वांशी समरस होऊन सर्वांना आपलेसे करणार्‍या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ !

साधेपणा हे श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे एक वैशिष्ट्य आहे. त्याला त्यांच्या मनमोकळ्या स्वभावाची आणि सुंदर आचरणाची जोड आहे. त्यामुळे त्यांच्या सहवासात सर्वांना आनंद मिळतो.

सनातनचे ३२ वे संत पू. सौरभ जोशी आणि ७४ व्या संत पू. (सौ.) संगीता जाधव यांच्या दत्तजयंतीच्या दिवशी झालेल्या भावभेटीतील अवर्णनीय क्षण !

‘१८.१२.२०२१ या दत्तजयंतीच्या दिवशी पू. (सौ.) संगीता जाधव यांनी पू. सौरभदादांची रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात भेट घेतली. त्या वेळी झालेले आमचे हे संभाषण…

धर्मकार्याची तीव्र तळमळ असलेले अधिवक्ता कृष्णमूर्ती यांनी गाठली ६४ टक्के, तर भगवंताविषयी अपार भक्ती असलेले सनदी लेखापाल श्री. सतीशचंद्र यांनी गाठली ६२ टक्के आध्यात्मिक पातळी !

सनातनचे पू. रमानंद गौडा यांनी भावपूर्ण वातावरणात या आनंदवार्ता घोषित केल्या.

शिस्तप्रिय आणि प्रेमळ स्वभावाच्या अन् आईप्रमाणे प्रेम करणार्‍या सासूबाई – कै. (श्रीमती) सुमन गडकरी (वय ८७ वर्षे) !

२१.११.२०२२ या दिवशी श्रीमती सुमन गडकरी यांचे निधन झाले. त्यांच्या संदर्भात जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे पुढे दिली आहेत.

वृद्धापकाळी देवद, पनवेल येथील आश्रमात रहायला येऊन जीवनाचे सार्थक करणार्‍या आणि आश्रमाप्रती भाव असलेल्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (श्रीमती) सुमन हनुमंत गडकरी (वय ८७ वर्षे) !

पू. रमेश गडकरी यांच्या मातोश्रींचे निधन झाले. उद्या १२ वा दिवस आहे. त्या निमित्ताने…