सेवेची तीव्र तळमळ असलेल्या ६६ टक्के आध्यात्मिक पातळी असणार्‍या देवद आश्रमातील सौ. लक्ष्मी नारायण पाटील !

पू. (सौ.) अश्विनी अतुल पवार यांना सौ. लक्ष्मी नारायण पाटील (पूर्वाश्रमीच्या कु. सोनाली गायकवाड) यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

पू. (सौ.) अश्विनी पवार

१. काटकसरी

सौ. लक्ष्मी नारायण पाटील

‘सौ. लक्ष्मी काटकसरी आहे. ती प्रत्येक वेळी वस्तू खरेदी करतांना अभ्यास करते. ती अनावश्यक वस्तू विकत घेत नाही आणि स्वतःकडील वस्तू काळजीपूर्वक वापरते.

२. शिकण्याची वृत्ती

आरंभी तिच्याकडे ज्या सेवांचे दायित्व दिले होते, त्या सर्वच सेवा तिच्यासाठी पुष्कळ नवीन होत्या. तेव्हा तिने ‘त्या सेवांमध्ये काय करणे अपेक्षित आहे ?’, ते सर्व शिकून घेतले आणि त्यातील बारकावे आत्मसात केले. आता ती प्रत्येकच सेवा परिपूर्ण आणि भावपूर्ण करण्यासाठी तळमळीने प्रयत्न करते.

३. सेवेची तळमळ

३ अ. सेवा पूर्ण न झाल्यास अस्वस्थ होणे : तिच्यात सेवेची पुष्कळ तळमळ आहे. ‘तिला दिलेली सेवा अपेक्षित अशी झाली नाही किंवा अल्प झाली, तर ती अस्वस्थ होते. तिच्याकडून ‘अधिकाधिक सेवा व्हावी’, अशी तिची सतत तळमळ असते. ती कधी घरी गेली, तरी तिथूनही सेवा करण्याचा प्रयत्न करते. ‘मी अजून काय सेवा करू ?’, असे ती विचारत असते.

३ आ. सेवा परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करणे : सोनालीला कोणतीही सेवा सांगितली, तरी ती करण्याची आणि त्यासाठी कष्ट घेण्याची तिची नेहमी सिद्धता असते. तेव्हा ती स्वतःचा विचार करत नाही. ती झोप किंवा तहान-भूक यांकडे पहात नाही. ‘तिला दिलेली सेवा परिपूर्ण व्हायला पाहिजे, त्यात काही न्यूनता रहायला नको’, असा तिचा विचार असतो.’

४. उत्तम निरीक्षणक्षमता

ती साधकांचे सत्संग घेतांना त्यांना पुष्कळ चांगल्या प्रकारे दृष्टीकोन देते. तिचे निरीक्षण चांगले असून ती साधकाची स्थिती लक्षात घेऊन त्यांना साधनेत चांगले साहाय्य करते.

– (पू.) सौ. अश्विनी अतुल पवार, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२२.१.२०२२)