पू. अश्विनीताई (टीप) आहेत आमची माऊली ।
बालकभावातून देतात आम्हाला आनंदाची सावली ।। १ ।।
गुरुकृपा संपादन कशी करायची, देतात आम्हा शिकवण ।
स्वतःमध्ये पालट करण्यास, अखंड करतात आम्हा आठवण ।। २ ।।
पू. ताई आहेत निरागसतेचे मूर्तीमंत रूप ।
त्यामुळे त्यांच्यात अनुभवता येईल गुरुमाऊलीचे स्वरूप ।। ३ ।।
पू. ताई आहेत निरपेक्ष प्रीतीचा झरा ।
त्यांच्या छत्रछायेखाली अखंड मिळावा आम्हा आसरा ।। ४ ।।
पू. ताईंची शिकवण कृतीत आणण्यास अल्प पडलो आम्ही ।
क्षमायाचना करून प्रार्थना करतो ।
ती कृतीत आणण्या शक्ती द्या गुरुमाऊली तुम्ही ।। ५ ।।
टीप – सनातनच्या संत पू. (सौ.) अश्विनी अतुल पवार
– सौ. कल्पना गडम, परभणी (१२.१२.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |