सनातनच्या ६४ व्या संत पू. (श्रीमती) शेऊबाई मारुति लोखंडे (वय ८७ वर्षे) यांची त्यांच्या नातसुनेला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

पू. आजी सकाळी उठल्यावर त्यांना सांगितलेला व्यायाम नियमित करतात. त्या झोपूनच पाय हलवणे, हात हलवणे, असे व्यायाम करतात. त्या म्हणतात, ‘‘व्यायाम केल्यामुळे मला बरे वाटते.’’

रत्नागिरी येथील सनातनच्या ५४ व्या संत पू. (श्रीमती) मंगला श्रीधर खेर (वय ९१ वर्षे) यांचा देहत्याग !

‘गुरु हेच अवघे विश्व’ असणार्‍या येथील सनातनच्या ५४ व्या संत पू. मंगला श्रीधर खेर (वय ९१ वर्षे) यांनी २९ जानेवारीच्या पहाटे ५ वाजून ३० मिनिटांनी देहत्याग केला. त्यांच्यावर सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी अंत्यसंस्कार करण्यात आले.

‘महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालया’ला चित्रीकरणासाठी लागणार्‍या साहित्‍याची आवश्‍यकता !

जे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी साहित्य अर्पण स्वरूपात देऊ शकतात अथवा ते खरेदी करण्यासाठी धनरूपात साहाय्य करण्यास इच्छुक आहेत, त्यांनी संपर्क साधावा.

तत्त्वनिष्‍ठ आणि आध्‍यात्मिक स्‍तरावर राहून साधकांकडून साधना करून घेणार्‍या सनातनच्‍या ६९ व्‍या संत पू. (सौ.) अश्‍विनी पवार आणि तळमळीने अन् गांभीर्याने साधना करणार्‍या ६६ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या सौ. लक्ष्मी पाटील !

१०.१२.२०२२ या दिवशीच्‍या दैनिक ‘सनातन प्रभात’ मधील लेखात सौ. लक्ष्मीताईंमधील ‘काटकसरीपणा, शिकण्‍याची वृत्ती, सेवेची तळमळ आणि उत्तम निरीक्षणक्षमता’ या गुणांचे वर्णन केले आहे. त्‍यातून मला त्यांच्यातील गुण शिकता आले आणि मी त्‍यांचे अभिनंदन केले. 

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्‍या ५२ व्‍या वाढदिवसानिमित्त काढलेल्‍या दैनिक ‘सनातन प्रभात’च्‍या विशेष पुरवणीच्‍या संरचनेची सेवा करतांना साधकाला आलेल्‍या अनुभूती

प.पू. गुरुदेवांच्‍या कृपेने मला श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्‍या ५२ व्‍या वाढदिवसानिमित्त दैनिक ‘सनातन प्रभात’ अंकाच्‍या संरचनेची सेवा करण्‍याची संधी मिळाली. ती सेवा करतांना मला आलेल्‍या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत. 

साधकांच्‍या सेवेतील अडथळे आणि त्रास दूर करून त्‍यांना सत्‍सेवेतील आनंद देणारे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले !

त्रास वाढल्‍यावर साधकांनी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना आर्ततेने प्रार्थना करावी. त्‍यामुळे त्‍यांचे त्रास दूर होऊन त्‍यांना सेवेला जाता येते आणि त्‍यातील आनंद घेता येतो. अनेक साधकांना अशा प्रकारच्‍या अनुभूती आल्‍या आहेत.

सनातनचे ४० वे संत पू. गुरुनाथ दाभोलकर (वय ८२ वर्षे) यांच्‍यामधील ‘सहजता, अहंशून्‍यता आणि शरणागतभाव’ या गुणांचे घडलेले दर्शन !

तुम्‍ही लहान वयात गुरुदेवांची सेवा करण्‍यासाठी इकडे आला आहात. तुम्‍ही या वयात साधना करण्‍यासाठी आला आहात. आम्‍ही आमचे अर्धे आयुष्‍य वाया घालवले’, असे वाटते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांची सर्वज्ञता आणि सनातन संस्थेचे प्रत्येक संत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी अंतरंगी जोडलेले असल्याचे अनुभवणे

परात्पर गुरुदेवांच्या एका वाक्याने प्रत्यक्ष भगवंताने प्रचीती दिली की, ‘ते प्रत्येक क्षणी आमच्या समवेत आहेत. आमचा प्रत्येक शब्द ते ऐकत आहेत. त्यांना सर्व ठाऊक असते.’