साधकांच्‍या सेवेतील अडथळे आणि त्रास दूर करून त्‍यांना सत्‍सेवेतील आनंद देणारे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले !

१. साधक सत्‍सेवेला जाण्‍यापासून परावृत्त व्‍हावेत, यासाठी वाईट शक्‍तींनी त्‍यांचे त्रास अकस्‍मात् वाढवणे

‘सत्‍सेवेला जाण्‍यापूर्वी पुष्‍कळ साधकांचे काही त्रास अकस्‍मात् वाढतात, उदा. डोके दुखणे, हात-पाय दुखणे, थकवा येणे इत्‍यादी. त्‍यामुळे काही साधक सेवेला न जाता घरीच थांबतात. साधक घरी थांबण्‍याने हे त्रास न्‍यून होत नाहीत. उलट त्‍यांचेे लक्ष सारखे त्रासांकडेच जाऊन नकारात्‍मकता वाढत जाते. साधक सत्‍सेवेला जाण्‍यापासून परावृत्त व्‍हावेत, यासाठी वाईट शक्‍ती असे त्रास अकस्‍मात् वाढवतात.

२. त्रास वाढल्‍यावर साधकांनी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना प्रार्थना करून सेवेला गेल्‍यास त्रास दूर होऊन साधकांना सत्‍सेवेतील आनंद घेता येणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

त्रास वाढल्‍यावर साधकांनी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना आर्ततेने प्रार्थना करावी. त्‍यामुळे त्‍यांचे त्रास दूर होऊन त्‍यांना सेवेला जाता येते आणि त्‍यातील आनंद घेता येतो. अनेक साधकांना अशा प्रकारच्‍या अनुभूती आल्‍या आहेत.

सत्‍सेवेला गेल्‍यानंतर साधकांचे त्रास न्‍यून होतात; कारण गुरुदेव (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले) साधकांचे त्रास स्‍वतःवर घेतात आणि त्‍यांना सेवेतील आनंद मिळवून देतात. ते साधकांकडून स्‍वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलनही करून घेतात. अशा प्रकारे गुरुदेव साधकांकडून ७० टक्‍के महत्त्व असलेली समष्‍टी साधना करून घेतात.

सत्‍सेवा करून घरी आल्‍यावर साधकांना त्‍यांच्‍या त्रासाची तीव्रता न्‍यून झाल्‍याचे लक्षात येते. याचे कारण सत्‍सेवेत मिळालेला आनंद त्रासापेक्षाही अधिक असतो. यातून ‘साधकांना आनंद मिळावा, याची गुरुमाऊलींना असलेली तळमळ किती उच्‍च कोटीची आहे’, हे लक्षात येते.

३. साधकांनी त्‍यांचे सर्व त्रास गुरूंवर सोपवून सत्‍सेवेला जाण्‍याचा निर्धार करावा !

पू. अशोक पात्रीकर

साधकांनी त्‍यांचे सर्व त्रास गुरूंवर सोपवून सत्‍सेवेसाठी घराबाहेर पडण्‍याचा निर्धार करावा. प.पू. भक्‍तराज महाराज यांच्‍या भजनातील पुढील पंक्‍ती साधकांनी लक्षात ठेवावी, ‘देह प्रारब्‍धावरी सोडा । चित्त चैतन्‍यासी जोडा ॥’ ‘चित्त चैतन्‍याशी जोडणे, म्‍हणजेच सत्‍सेवा करणे’ होय; कारण ती गुरूंच्‍या समष्‍टी रूपाची सेवा आहे.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी सुचवलेले हे शब्‍द त्‍यांच्‍या चरणी कृतज्ञताभावाने समर्पित करतो.’

– गुरुसेवक,
(पू.) अशोक पात्रीकर (वय ७२ वर्षे), अमरावती (२६.१२.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक