तत्त्वनिष्‍ठ आणि आध्‍यात्मिक स्‍तरावर राहून साधकांकडून साधना करून घेणार्‍या सनातनच्‍या ६९ व्‍या संत पू. (सौ.) अश्‍विनी पवार आणि तळमळीने अन् गांभीर्याने साधना करणार्‍या ६६ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या सौ. लक्ष्मी पाटील !

पू. शिवाजी वटकर

‘१०.१२.२०२२ या दिवशीच्‍या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्‍ये पू. (सौ.) अश्‍विनी पवार (वय ३३ वर्षे) यांनी लिहिलेला ‘सेवेची तीव्र तळमळ असलेल्‍या ६६ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी असणार्‍या देवद आश्रमातील सौ. लक्ष्मी नारायण पाटील (वय ३२ वर्षे)!’, हा लेख प्रकाशित झाला. त्‍या लेखात सौ. लक्ष्मीताईंमधील ‘काटकसरीपणा, शिकण्‍याची वृत्ती, सेवेची तळमळ आणि उत्तम निरीक्षणक्षमता’ या गुणांचे वर्णन केले आहे. त्‍या लेखातून मला सौ. लक्ष्मीताईंमधील गुण शिकता आले आणि मी त्‍यांचे अभिनंदन केले. 

१. पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्‍ये लेख लिहून सौ. लक्ष्मी पाटील यांचे कौतुक केले असतांनाही सौ. लक्ष्मी पाटील यांनी फलकावर चुका लिहिणे

पू. (सौ.) अश्विनी पवार

१२.१२.२०२२ या दिवशी मी सकाळी भोजनकक्षात प्रसाद घेत असतांना तेथील फलकांवर साधकांनी लिहिलेल्‍या चुका वाचत होतो. ११.१२.२०२२ या दिवशी सौ. लक्ष्मी पाटील यांनी ‘अनेकदा सांगूनही पुढील सेवांचे नियोजन केले जात नाही आणि सेवांचा आढावा अपूर्ण पाठवला जातो. त्‍यामुळे संतांना त्‍याविषयी पुनःपुन्‍हा पाठपुरावा करावा लागतो,’ या २ चुका स्‍वभावदोषांसहित फलकावर लिहिल्‍या होत्‍या. दैनिक ‘सनातन प्रभात’मधील लेखातून त्‍यांचा गुणगौरव झाला असतांनाही त्‍यांनी फलकावर चुका लिहिल्‍या. मला त्‍यांचे फार कौतुक वाटले. मी माझ्‍यासमवेत प्रसाद घेत असलेल्‍या साधकांना सौ. लक्ष्मीताईंनी लिहिलेल्‍या चुका दाखवून ‘आपण यातून शिकूया’, असे सांगितले.

२. सौ. लक्ष्मी पाटील यांनी ‘साधनेचे प्रयत्न करायला अल्‍प पडते’, असे सांगणे

सौ. लक्ष्मी नारायण पाटील

त्‍यानंतर मला लक्ष्मीताई भेटल्‍या. तेव्‍हा मी त्‍यांच्‍या मनाची प्रक्रिया जाणून घेतली. मी त्‍यांना विचारले, ‘‘दैनिक ‘सनातन प्रभात’मध्‍ये तुमच्‍या गुणवैशिष्‍ट्यांविषयी लेख छापून आला असतांनाही तुम्‍ही चुका कशा लिहिल्‍या ?’’ तेव्‍हा त्‍या मला म्‍हणाल्‍या, ‘‘मी फलकावर चुका लिहायला आणि साधनेचे प्रयत्न करायला अल्‍प पडते. आता मी प्रयत्न वाढवत आहे. पू. अश्‍विनीताईंनी या चुका दाखवून दिल्‍या.’’ तेव्‍हा मी त्‍यांना म्‍हणालो, ‘‘तुमच्‍यात लढाऊ वृत्ती आहे. तुम्‍ही स्‍वतःतील स्‍वभावदोषांविरुद्ध चांगले लढत आहात. असेच प्रयत्न वाढवूया.’’

३. पू. (सौ.) अश्‍विनी पवार तत्त्वनिष्‍ठ आणि आध्‍यात्मिक स्‍तरावर राहून सौ. लक्ष्मी पाटील यांना चुका सांगून त्‍यांना घडवत असणे

त्‍यानंतर मी ‘पू. अश्‍विनीताईंनी लिहिलेला सौ. लक्ष्मीताईंतील गुणवैशिष्‍ट्यांचा लेख आणि सौ. लक्ष्मीताईंनी लिहिलेल्‍या फलकावरील चुका’ यांविषयी पू. अश्‍विनीताईंशी बोललो. मी त्‍यांना म्‍हणालो, ‘‘तुम्‍ही लिहिलेला लेख प्रसिद्ध झाला आणि त्‍यानंतर ‘लक्ष्मीताईंनी फलकावर त्‍यांच्‍याकडून झालेल्‍या चुका लिहिल्‍या’, हे पाहून मला आश्‍चर्य वाटले. पू. ताई म्‍हणाल्‍या, ‘‘काही प्रसंगांत लक्ष्मीच्‍या चुका माझ्‍या लक्षात आल्‍या. मी तिला त्‍या चुका सांगून फलकावर लिहायला सांगितल्‍या. देवाने मला सुचवले आणि तिला आध्‍यात्मिक स्‍तरावर सांगता आले. मी तिच्‍याविषयीच्‍या लेखात ‘तिला सेवेची तळमळ आहे’, असे लिहिले, तर त्‍याच वेळी ‘तिने साधनेच्‍या दृष्‍टीने काय केले  पाहिजे ?’, हे देवाने मला सुचवले.’’

४. सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांंच्‍या कृपाशीर्वादामुळे सनातनच्‍या साधकांची योग्‍य दिशेने साधना होत असणे

त्‍यानंतर पू. अश्‍विनीताईंनी मला विचारले, ‘‘पू. काका, तुमच्‍या काय लक्षात आले ?’’ मी त्‍यांना म्‍हणालो, ‘‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना घडवले. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांनी पू. अश्‍विनीताईंना घडवले आणि पू. अश्‍विनीताई लक्ष्मीताईंना घडवत आहेत.

सनातन संस्‍थेत साधकांच्‍या गुणांचे कौतुक केले जाते, तसेच ‘त्‍यांची आणखी प्रगती कशी होईल ?’, याचा विचार केला जातो. साधकांना त्‍यांच्‍याकडून झालेल्‍या चुका सांगून त्‍यांच्‍याकडून साधना करून घेतली जात आहे. साधकांचा सूक्ष्म अहं वाढू नये, यासाठी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले काळजी घेत आहेत. सनातन संस्‍था सोडून अन्‍यत्र असे कुठेच होत नसेल. अन्‍य ठिकाणी कुणी काही चांगले केले, तर त्‍याचा हारतुरे घालून आणि अनावश्‍यक प्रशंसा करून अन् अहं वाढवून त्‍याची आध्‍यात्मिक दृष्‍टीने हानी केली जाते. सनातनमध्‍ये ‘साधना म्‍हणून मी कुठे अल्‍प पडतो ? मी आणखी काय केले पाहिजे ? मी गुरुचरणांजवळ लवकर कसा जाऊ ?’, याचाच साधक आणि त्‍यांना मार्गदर्शन करणारे सतत विचार करतात.’’

वरील प्रसंगातून मला शिकायला मिळून साधनेसाठी प्रेरणा मिळाली. तत्त्वनिष्‍ठ आणि आध्‍यात्मिक स्‍तरावर राहून साधकांकडून साधना करून घेणार्‍या धन्‍य त्‍या पू. (सौ.) अश्‍विनी पवार आणि तळमळीने अन् गांभीर्याने साधना करणार्‍या सौ. लक्ष्मी पाटील ! ज्‍यांच्‍या कृपाशीर्वादाने हे घडत आहे, त्‍या सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या चरणी मी शरणागतभावाने कोटीशः कृतज्ञता व्‍यक्‍त करतो.’

– (पू.) शिवाजी वटकर (वय ७६ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१३.१२.२०२२)