प्रेमभाव, सहजता आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असलेल्या सनातनच्या ९० व्या संत पू. (सौ.) शैलजा सदाशिव परांजपे (वय ७४ वर्षे) (श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या आई) !

श्रावण कृष्ण पंचमी (१६.८.२०२२) या दिवशी सनातनच्या ९० व्या संत पू. (सौ.) शैलजा सदाशिव परांजपे यांचा ७४ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांच्यातील काही गुणांचे घडलेले दर्शन पुढे दिले आहे.

सदैव कृतज्ञताभावात रहाणार्‍या आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असणार्‍या जयपूर येथील पू. (श्रीमती) गीतादेवी खेमका (वय ८० वर्षे) !

पू. (श्रीमती) गीतादेवी खेमका यांचा ८० वा वाढदिवस श्रावण कृष्ण षष्ठी (१७.८.२०२२) या दिवशी आहे. त्यानिमित्त त्यांच्या कुटुंबियांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

गुरुमाऊलीचे ज्ञान अन् चैतन्य देण्या ती सोलापूर नगरीत आली ।

पू. दीपाली मतकर, सोलापूर यांचा मागील वर्षी २४.७.२०२१ या दिवशी वाढदिवस झाला. त्या निमित्ताने साधिकेला (त्या संत होण्यापूर्वी) सुचलेल्या कविता पुढे दिली आहे.

कलियुगामध्ये श्रीकृष्णाने निर्मिल्या दीपालीसारख्या गोपी ।

पू. दीपाली मतकर यांचा २८.१०.२०२१ या दिवशी संतसन्मान सोहळा झाला. त्या निमित्ताने आधुनिक वैद्या (डॉ.) शिल्पा कोठावळे यांना सुचलेले काव्य येथे दिले आहे.

सनातनच्या संत पू. दीपाली मतकर यांना साधनेच्या आरंभीच्या काळात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पदोपदी सूक्ष्मातून साहाय्य करण्याच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

सनातनच्या ११२ व्या समष्टी संत पू. दीपाली मतकर यांचा श्रावण कृष्ण द्वितीया (१३ ऑगस्ट २०२२) या दिवशी वाढदिवस झाला. त्या निमित्ताने त्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले गुरुरूपात भेटल्यामुळे जीवन सार्थकी लागले’, या भावाने त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करणार्‍या सनातनच्या ९० व्या संत पू. (सौ.) शैलजा परांजपे (वय ७४ वर्षे) !

श्रावण कृष्ण पंचमी (१६.८.२०२२) या दिवशी सनातनच्या ९० व्या संत पू. (सौ.) शैलजा सदाशिव परांजपे यांचा ७४ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांनी गुरुदेवांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) पाठवलेले पत्र येथे दिले आहे.

‘साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी’, असे जीवन जगलेल्या आणि दुर्धर व्याधीतही तळमळीने साधना करून आध्यात्मिक प्रगती करणार्‍या पू. (कै.) सौ. प्रमिला रामदास केसरकर यांचा साधनाप्रवास !

अधिवक्ता रामदास धोंडू केसरकर यांनी पत्नी कै. (सौ.) प्रमिला केसरकर यांचा उलगडलेला साधनाप्रवास पुढे दिला आहे.

सनातनच्या साधिका कै. (सौ.) प्रमिला रामदास केसरकर सनातनच्या १२१ व्या आणि कै. (सौ.) शालिनी प्रकाश मराठे सनातनच्या १२२ व्या संतपदी विराजमान !

मूळ ठाणे येथील दांपत्य अधिवक्ता रामदास केसरकर आणि सौ. प्रमिला केसरकर २७ वर्षांपूर्वी सनातन संस्थेच्या संपर्कात आले अन् त्यांनी साधनेला आरंभ केला. वर्ष २००८ मध्ये ते दोघेही रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात साधनेसाठी आले.

कै. (सौ.) शालिनी मराठे यांच्या निधनानंतर त्यांचा अंत्यसंस्कार विधी आणि त्यांच्या लिंगदेहाचा मृत्यूत्तर प्रवास यांचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

‘१६.७.२०२२ या दिवशी सनातन संस्थेच्या साधिका सौ. शालिनी मराठे (वय ७४ वर्षे) यांचे आजारामुळे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांचा अंत्यसंस्कार विधी आणि त्यांच्या लिंगदेहाचा मृत्यूनंतरचा प्रवास यांचे सूक्ष्म परीक्षण येथे देत आहे.