ईश्वराचे श्रेष्ठत्व जाणा !
‘मानवाने आतापर्यंत अनेक गोष्टींचा शोध लावला आहे; मात्र मानवाच्या लक्षात येत नाही की, त्याने शोध लावलेली प्रत्येक गोष्ट नीट चालण्यासाठी ईश्वरी आशीर्वादाची आवश्यकता आहे.
ज्ञानीच वैकुंठाचे मोल जाणू शकणे
तुकाराम महाराज आवडीला (पत्नीला) वैकुंठाला नेणार होते. तेव्हा आवडी म्हणाली, ‘‘जावा तुम्ही. माझ्या म्हशीचे कोण करणार ?
गुरूंच्या मनातील विचार सर्वांना कळण्यासाठी सप्तर्षी कार्य करत असणे
‘गुरूंच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) सूक्ष्म मनामध्ये येणारे विचार पृथ्वीवर कुणालाच कळत नाहीत. ते आम्हाला कळतात. ते विचार सर्वांना कळावेत, यासाठी आम्ही सप्तर्षी कार्य करत आहोत.’
कलाकारांनो, गोप-गोपींप्रमाणे ईश्वरप्राप्तीसाठी गायन आणि नृत्य करून या कलांद्वारे सर्वाेच्च आनंदाची अनुभूती घ्या !
कलाकारांनो, प्रत्येक कलेची निर्मिती ही भगवंतप्राप्तीसाठी झालेली आहे’, हे कलेचे मूळ उद्दिष्ट जाणून या कलांद्वारे गोप-गोपींप्रमाणे भगवंतप्राप्ती करूया !
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची अमृतवचने !
साधना करतांना सारखे भावावस्थेत राहिलो, तर गुरु आपल्याला आयुष्यात काहीही अल्प पडू देत नाही.
स्वयंसूचनासत्र करण्यापूर्वी ५ मिनिटे नामजप करणे, प्रार्थना, कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक !
चित्तामध्ये स्वयंसूचना ग्रहण होण्यासाठी सूचनेभोवती चैतन्याचे वलय असणे, म्हणजे नुसते शब्द नको, तर भावाचे आलंबन करून चित्तामध्ये तात्पुरते चैतन्य निर्माण करणे आवश्यक आहे. असे केले, तरच ती सूचना आवश्यक त्या ठिकाणी जाऊन अपेक्षित परिणाम होतो.
साधकांनो, दास्यभावाचे प्रतीक असलेल्या रामभक्त हनुमानाप्रमाणे अंतरात सेवकभाव निर्माण करून स्वतःतील अहंचे निर्मूलन करण्यासाठी प्रयत्न करा !
सर्व साधकांनी स्वतःत हनुमानाप्रमाणे सेवकभाव (दास्यभाव) निर्माण होण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यामुळे त्यांच्यात नम्रता, लीनता, गुरुनिष्ठा, गुरूंचे मन जिंकण्याची आंतरिक तळमळ आदी गुण वृद्धींगत होऊन अहंचे निर्मूलन होऊ लागेल आणि साधकांसाठी ईश्वरप्राप्तीचा मार्ग सुकर होईल !
मनुष्याला कितीही ज्ञान असले, तरी ‘त्या ज्ञानाचा उपयोग कसा करायचा ?’, हे त्याला अध्यात्मच शिकवते !
‘मनुष्य कितीही शिकला आणि त्याने कितीही ज्ञान मिळवले, तरी ‘मिळालेल्या ज्ञानाच्या सागरातून एखाद्या प्रसंगी नेमक्या कोणत्या ज्ञानाचा उपयोग करायचा ?’, हे बुद्धीने ठरवणे फार अवघड असते.