‘मनुष्य कितीही शिकला आणि त्याने कितीही ज्ञान मिळवले, तरी ‘मिळालेल्या ज्ञानाच्या सागरातून एखाद्या प्रसंगी नेमक्या कोणत्या ज्ञानाचा उपयोग करायचा ?’, हे बुद्धीने ठरवणे फार अवघड असते. त्यासाठी त्याला पुन्हा त्या विषयाची पुस्तके चाळावी लागतात. याउलट ज्ञानी माणूस साधनारत असला आणि त्याचा मनोलय अन् बुद्धीलय झालेला असला, तर त्याला भगवंतच ‘नेमके कोणते ज्ञान उपयोगात आणायचे ?’, हे सुचवतो. तसेच ‘एखाद्या प्रसंगी काय निर्णय घ्यायचा ?’, हेही भगवंतच सुचवतो. त्याला बुद्धीने विचार करावा लागत नाही. फारतर तो ‘देवाने सुचवलेला पर्याय योग्य आहे ना ?’, याचा पडताळा करून घेऊ शकतो. खरेतर अध्यात्मातील अधिकारी व्यक्ती फारसे शिकलेल्या नसल्या, तरी त्यांना सर्व विषयांचे ज्ञान देव करून देत असल्याने सर्वज्ञ असतात !’
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (३०.४.२०२२)