अन्य संप्रदायातील साधकाने सनातनमध्ये पूर्णवेळ साधना करण्याचा निश्चय केल्यावर त्याला विरोध करून त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करणारे एक तथाकथित संत !

मी गेल्या काही वर्षांपासून एका संतांकडे सेवा करतो आणि त्यांनी रहाण्यासाठी दिलेल्या बंगल्यात रहातो. मी त्या संतांना सनातन संस्थेमध्ये साधनेसाठी पूर्णवेळ जाणार असल्याचे सांगितले, तेव्हा त्या संतांनी या विचारापासून परावृत्त करण्यासाठी मला कोरा धनादेश दिला, तसेच आणखी पैसा आणि गाडी देणार असल्याचे सांगितले.

साधकांनो, ‘आपत्कालामध्ये घडणारा प्रसंग आणि परिस्थिती ही शिकण्यासाठी अन् स्वत:ला पालटण्यासाठी संधी असून ‘ईश्वरप्राप्ती’ या ध्येयाच्या दिशेने नेणारी आहे’, असा सकारात्मक विचार करा !

‘प्रत्येक प्रसंगात आणि परिस्थितीत माझ्याकडून देवाला काय अपेक्षित आहे ? त्याला काय शिकवायचे आहे ? मी कुठे आहे ?’, असा अंतर्मुख होऊन विचार करा.

gurupournima

गुरुकृपायोगाची वैशिष्ट्ये

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी निर्मिलेल्या ‘गुरुकृपायोगा’तील अष्टांग साधनेने चित्तशुद्धी लवकर होते. त्यातही स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन, सत्सेवा आणि भाववृद्धी यांचे महत्त्व अधिक आहे.

पोलिसांनो, निर्दाेष व्यक्तीला त्रास दिल्याचे पाप लागू नये, म्हणून प्रतिदिन अधिकाधिक साधना करा !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साधनेविषयक मार्गदर्शन

सूक्ष्मातून मिळणाऱ्या ज्ञानाचा लाभ !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अध्यात्माविषयी मार्गदर्शन

‘अध्यात्मप्रसाराचा केंद्रबिंदू ‘नवीन साधक सिद्ध होणे’ हा असायला हवा’, याविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन

एकदा सत्संगात दोन  साधकांनी सनातन संस्थेचे ग्रंथ आणि उत्पादने यांना समाजातून भरघोस प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले. त्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले म्हणाले, ‘‘आपल्या दृष्टीने अध्यात्मप्रसार करतांना ‘नवीन साधक सिद्ध होणे’, ही फलनिष्पत्ती सर्वाधिक महत्त्वाची आहे.

आजीवन ब्रह्मचारी रहाण्याचे व्रत घेतलेल्या मारुतिरायाने विद्यार्जनासाठी विवाह करणे

आपल्याला अन्य देवांसारखा मारुति त्याच्या पत्नीच्या समवेत कधीच दिसत नाही. तो एकटाच असतो. आपल्याला त्याला त्याच्या पत्नीच्या समवेत पहायचे असेल, तर आंध्रप्रदेशातील खम्माम या जिल्ह्यात मारुतीचे एक प्राचीन मंदिर आहे. ते एकमेव मंदिर आहे, जिथे मारुति आपल्या पत्नीच्या समवेत आहे.

बुद्धीवादी मनुष्याला बुद्धीने देव समजण्यासाठी विज्ञानाची निर्मिती होणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे बोधप्रद मार्गदर्शन

संकटसमयी ‘परमेश्वर तुमच्या पाठीशी आहे’, हा भाव, ही श्रद्धा तुम्हाला तारू शकते !

श्रद्धा डळमळीत होते, अशा वेळी आस्तिक असणे, हे नास्तिक असण्यापेक्षा नेहमीच पथ्यावर पडते. जेव्हा तुमचे कुणीच नसते, तुमच्या साहाय्याला कुणी नसते, तेव्हा तुम्ही आस्तिक असाल, तर ‘परमेश्वर तुमच्या पाठीशी आहे’, हा भाव, ही श्रद्धा तुम्हाला तारू शकते

श्रद्धाहीन अन् बुद्धीवादी समाजाला विज्ञानाच्या आधारेच अध्यात्म पटवून द्यावे लागते !

पूर्वीच्या काळी सर्वांची ऋषिमुनी आणि गुरु यांनी सांगितलेल्या ज्ञानावर श्रद्धा असायची. आता त्यांच्यावर श्रद्धा न ठेवता विज्ञानावर ठेवत असल्यामुळे वैज्ञानिक उपकरणांच्या आधारे सहस्रो प्रयोग करून अध्यात्म सिद्ध करावे लागत आहेत.’