गुरूंच्या मनातील विचार सर्वांना कळण्यासाठी सप्तर्षी कार्य करत असणे

‘गुरूंच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) सूक्ष्म मनामध्ये येणारे विचार पृथ्वीवर कुणालाच कळत नाहीत. ते आम्हाला कळतात. ते विचार सर्वांना कळावेत, यासाठी आम्ही सप्तर्षी कार्य करत आहोत.’

– श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ (संदर्भ : सप्तर्षी जीवनाडीपट्टी वाचन क्र. ११६, देहली, ३.३.२०१७)

(३.३.२०१७ या दिवशी देहली दुपारी १२.३८ ते ३.४८ पर्यंत पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी सप्तर्षी जीवनाडीपट्टीचे वाचन केले. ते नाडीपट्टी वाचन क्र. ११६ होते.)

(‘सूक्ष्म मनामध्ये येणारे विचार मलाही कळत नाहीत. केवळ सप्तर्षींनी सांगितल्यावर मला ते कळतात.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (९.३.२०१७))

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.