युक्रेनहून आतापर्यंत ११ सहस्र भारतीय परतले

भारताने ‘ऑपरेशन गंगा’ अंतर्गत आतापर्यंत ११ सहस्र भारतियांना युक्रेनमधून सुरक्षित परत आणले आहे, अशी माहिती परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन् यांनी दिली. आतापर्यंत ४८ विमाने भारतात पोचली असून त्यांपैकी १८ विमाने ही गेल्या २४ घंट्यांत पोचली आहेत.

पुतिन यांना संपवणे, हे जगासाठी उत्तम काम ठरेल ! – अमेरिकेचे खासदार लिंडसे ग्रॅहम

जेव्हा पुतिन यांना संपवले जाईल. तुम्ही तुमच्या देशासाठी आणि जगासाठी उत्तम काम कराल, असे ट्वीट करत अमेरिकेचे खासदार लिंडसे ग्रॅहम यांनी पुतिन यांची हत्या करण्याची भाषा केली आहे.

रशिया-युक्रेन युद्धाविषयी भारताने स्वत:चे हित पाहून निर्णय घ्यायला हवेत ! – (निवृत्त) मेजर जनरल जगतबीर सिंह, भारतीय सेना

भारताला रशिया-युक्रेन युद्धाविषयी काळजीपूर्वक भूमिका घेतली पाहिजे आणि भारताचे हित पाहूनच पुढील पावले उचलली पाहिजेत.

भारताने काय भूमिका घ्यावी, हे त्याला कुणी सांगू नये ! – फ्रान्सच्या राजदूतांची स्पष्टोक्ती

भारताचे मत फार महत्त्वाचे आहे, तरीही भारताने काय भूमिका घ्यावी, हे कुणीही सूचवण्याची आवश्यकता नाही.

युक्रेनला साहाय्य करण्याचे खलिस्तानी आतंकवाद्यांचे आवाहन !

खलिस्तानी आतंकवादाचा बीमोड करण्यासाठी सरकारने आतापासूनच कठोर पावले उचलणे आवश्यक आहे !

भारतियांना बाहेर काढण्यासाठी रशियाने ६ घंटे युद्ध थांबवल्याच्या वृत्ताचे परराष्ट्र मंत्रालयाकडून खंडन

‘आमच्या विनंतीवरून रशियाने युद्ध थांबवलेले नाही. ‘युद्ध थांबवले’ असे सांगणे म्हणजे ‘आमच्या सांगण्यावरून पुन्हा बाँबफेक चालू होईल कि काय ?’, असे सांगण्यासारखे आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटले आहे.

कीव येथील गोळीबारात भारतीय विद्यार्थी घायाळ ! – केंद्रीय मंत्री व्ही.के. सिंह

व्ही.के. सिंह म्हणाले की, हा विद्यार्थी कीवमधून पळून जाण्याचा प्रयत्न करत असतांना त्याच्यावर गोळी झाडली गेली. यानंतर त्याला पुन्हा शहरात नेऊन रुग्णालयात भरती करण्यात आले.

युक्रेनमध्ये आणखी वाईट काळ येणार आहे ! – फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्राँन

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्राँन यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी दूरभाषवरून ९० मिनिटे चर्चा केल्यानंतर ‘युक्रेनमध्ये आणखी वाईट काळ येणार आहे,’ अशी चेतावणी दिली.

युक्रेनमध्ये असलेल्या युरोपमधील सर्वांत मोठ्या अणूऊर्जा केंद्रावर रशियाचे नियंत्रण

नीपर नदीच्या किनारी असलेल्या युक्रेनच्या अणूऊर्जा केंद्रावर रशियाने आक्रमण करून ते स्वतःच्या नियंत्रणात घेतले आहे. हे केंद्र युरोपमधील सर्वांत मोठे, तर पृथ्वीवरील ९ व्या क्रमांकाचे अणूऊर्जा केंद्र आहे. या अणूऊर्जा प्रकल्पातून युक्रेनला ४० टक्के अणुऊर्जेचा पुरवठा होतो.

जर्मनी युक्रेनला २ सहस्र ७०० क्षेपणास्त्रे देणार

संयुक्त राष्ट्र महासभेने एक प्रस्ताव संमत करून रशियन सैन्याला युक्रेनमधून बाहेर पडण्यास सांगितले आहे. दुसरीकडे जर्मनीने युक्रेनला २ सहस्र ७०० क्षेपणास्त्रे देण्याची घोषणा केली आहे.