खलिस्तानी आतंकवादाचा बीमोड करण्यासाठी सरकारने आतापासूनच कठोर पावले उचलणे आवश्यक आहे ! – संपादक
कीव (युक्रेन) – खलिस्तानवादी ‘सिख फॉर जस्टिस’ या आतंकवादी संघटनेने युक्रेनला साहाय्य करण्याचे आवाहन केले आहे. युक्रेनच्या रक्षणासाठी विदेशी आतंकवाद्यांना एकत्रित करण्याचे आवाहनही त्यांनी केले. ‘सिख फॉर जस्टिस’ने युक्रेनला साहाय्याची घोषणा करणारे पत्र आणि व्हिडिओ पाठवला आहे. यात त्याने युक्रेनच्या राष्ट्रध्याक्षांना युक्रेनच्या सैन्यदलात स्वतंत्र शीख खलिस्तानी सैन्याची तुकडी सिद्ध करण्याचे आवाहन केले आहे.
Terrorist org Sikhs For Justice calls for Khalistanis to support Ukraine, asks Ukraine President to raise a Sikh regimenthttps://t.co/KfuDLTYArX
— OpIndia.com (@OpIndia_com) March 2, 2022
(म्हणे) ‘भारतविरोधी गटाला पाठिंबा देऊन पंजाब मुक्त करण्याची हीच वेळ !’
या पत्रात आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याने म्हटले आहे की, ‘आम्ही युक्रेनचे सार्वभौमत्त्व आणि प्रादेशिक अखंडता यांचे रक्षण करण्यासाठी सिद्ध आहोत. रशिया-युक्रेन युद्धाच्या प्रकरणी भारताने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत मतदानात भाग न घेऊन रशियाला साहाय्य केले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतविरोधी गटाला पाठिंबा देऊन पंजाब मुक्त करण्याची हीच वेळ आहे.’