वॉशिंग्टन (अमेरिका) – रशियामध्ये कुणी ब्रुट्स आहे का ? रशियन सैन्यात कर्नल स्टॉफेनबर्ग यांच्याहून यशस्वी कुणी आहे का ? रशियाच्या या दु:खद स्वप्नाचा अंत तेव्हाच होईल, जेव्हा पुतिन यांना संपवले जाईल. तुम्ही तुमच्या देशासाठी आणि जगासाठी उत्तम काम कराल, असे ट्वीट करत अमेरिकेचे खासदार लिंडसे ग्रॅहम यांनी पुतिन यांची हत्या करण्याची भाषा केली आहे.
Is there a Brutus in Russia? Is there a more successful Colonel Stauffenberg in the Russian military?
The only way this ends is for somebody in Russia to take this guy out.
You would be doing your country – and the world – a great service.
— Lindsey Graham (@LindseyGrahamSC) March 4, 2022
ब्रुट्स हा रोमन गणराज्याचा नेता होता. त्याने ज्युलियस सीझर या रोमन जनरलची हत्या केली होती. जर्मन सैन्याधिकारी कर्नल स्टॉफेनबर्ग याने २० जुलै १९४४ या दिवशी जर्मनीचा हुकूमशहा हिटलर याच्या हत्येचा प्रयत्न केला होता.
South Carolina Sen. Lindsey Graham is facing pushback from the White House and all corners of Washington after calling for the assassination of President Vladimir Putin by the Russian people. https://t.co/2EK0KFmCro
— NBC4 Washington (@nbcwashington) March 4, 2022
खासदार ग्रॅहम यांच्या या ट्वीटवर रशियाचे अमेरिकेतील राजदूत अंतोली अँटोव्ह यांनी प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटले, ‘पुतिन यांच्या हत्येची भाषा करणे हा गुन्हा आहे. यावर अमेरिकेने अधिकृतरित्या स्पष्टीकरण दिले पाहिजे.’