भारताने काय भूमिका घ्यावी, हे त्याला कुणी सांगू नये ! – फ्रान्सच्या राजदूतांची स्पष्टोक्ती

पॅरिस (फ्रान्स) – युद्धाचे संकट दिवसेंदिवस अधिक गंभीर होत असतांना भारताकडून यासंदर्भात पाठिंबा मिळाल्यास त्याचे आम्ही स्वागत करू. भारताचे मत फार महत्त्वाचे आहे, तरीही भारताने काय भूमिका घ्यावी, हे कुणीही सूचवण्याची आवश्यकता नाही. भारताने स्वतःचे हित लक्षात घेऊन ही भूमिका घेतली आहे, असे स्पष्ट मत फ्रान्सचे भारतातील राजदूत इमॅन्युएल लेनिन यांनी रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाविषयी भारताच्या भूमिकेच्या संदर्भात व्यक्त केले.

फ्रान्सच्या राजदूतांना संयुक्त राष्ट्रांसमोर रशियावरील निर्बंधांच्या संदर्भातील प्रस्ताव ठेवण्यावरून पत्रकारांकडून प्रश्‍न विचारण्यात आला होता. त्यावर ते बोलत होते. या युद्धाविषयी भारताची भूमिका तटस्थ राहिली आहे. ‘रशियाचे ‘नाटो’शी (नॉर्थ अ‍ॅटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन’शी) असलेले मतभेद चर्चेतूनच सोडवता येऊ शकतात,’ अशी भूमिका भारताने यापूर्वी मांडलेली आहे.