मॉस्को (रशिया) – मॉस्को शहराचे महापौर सर्गेई सोबयानिन यांनी दावा केला, ‘येथे रात्री ड्रोनद्वारे २ इमारतींवर आक्रमण करण्यात आले. यात जीवित हानी झालेली नाही.’ रशियाची वृत्तसंस्था ‘तास’च्या माहितीनुसार एक ड्रोन रशियाच्या संरक्षण मंत्रालयाजवळील इमारतीवर पडले, तर दुसरे लिकचेवा स्ट्रीट वरील एक व्यापार केंद्रवर कोसळले. संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, आम्ही युक्रेनचे २ ड्रोन पाडले आहेत. युक्रेनकडून मॉस्कोवर याद्वारे आतंकवादी आक्रमण करण्याचा प्रयत्न करण्यात आला, जो आम्ही हाणून पाडला.
Russia says it foiled a Ukrainian drone attack on Moscow https://t.co/dQf0RJysaa
— Al Jazeera English (@AJEnglish) July 24, 2023