रशियन सैनिक राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या आदेशाचे पालन करत नाहीत !

‘इन्स्टिट्यूट फॉर द स्टडी ऑफ वॉर’च्या अहवालातील दावा


मॉस्को – रशियन सैनिक राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या आदेशाचे पालन करत नसल्याचे वृत्त आहे. त्यामुळे युक्रेनच्या विरोधातील युद्धात रशियासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. ‘इन्स्टिट्यूट फॉर द स्टडी ऑफ वॉर’च्या अहवालानुसार, रशियन कमांडर हे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या आदेशाचे पालन करत नाहीत. त्यांची ही सवय आता इतर सैनिकांनाही लागली आहे. ५८ वे संयुक्त शस्त्र सेना कमांडर पोपोव्ह यांना बडतर्फ केल्याविषयी संताप व्यक्त करण्यात येत असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

रशियाच्या सैन्यातील बर्‍याच वरिष्ठ अधिकार्‍यांना बडतर्फ करण्यात आले आहे. युद्धासाठी पुतिन यांच्या अवास्तव मागण्या, सैन्यातील अडथळे आणि रशियन संरक्षण मंत्रालयाची अकार्यक्षमता, याला कारणीभूत आहे. पुतिन यांनी त्वरित निकाल मिळवण्यासाठी अधिकार्‍यांकडे दुर्लक्ष केल्याने ही स्थिती उद्भवली आहे, असे ‘इन्स्टिट्यूट फॉर द स्टडी ऑफ वॉर’ने म्हटले आहे.