चौघांचा जागीच मृत्यू, तर २२ जण घायाळ
पुणे – येथे पुणे-बेंगळुरू महामार्गावरील नवले पुलाजवळ स्वामी नारायण मंदिर येथे २२ एप्रिलला मध्यरात्री ट्रक आणि ‘ट्रॅव्हल’ बसचा भीषण अपघात झाला. या घटनेमध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला असून २२ जण घायाळ झाले आहेत. अपघात झाल्याचे कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घायाळांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी नेले. अपघातातील इतर प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून अधिक अन्वेषण चालू आहे, तसेच अपघातातील घायाळ आणि मृत प्रवासी मुंबईचे होते कि कोल्हापूरचे याची ओळख पटवली जात आहे.
कोल्हापूरवरून मुंबईच्या दिशेने २५ प्रवाशांना घेऊन एक बस जात होती. त्या वेळी साखरेची वाहतूक करणार्या ट्रकने पाठीमागून बसला जोरात धडक दिली. भरधाव असलेल्या मालवाहू ट्रकचा ब्रेक निकामी झाल्याने ट्रक थेट खासगी ‘ट्रॅव्हल्स’वर जाऊन आदळल्याने हा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, ट्रकच्या केबिनचा चक्काचूर झाला. या धडकेत बस आणि ट्रक पलटी झाले.
#Pune – #Navale_Bridge_Accident | पुणे : नवले पुलाजवळ पुन्हा भीषण अपघात ! चौघांचा मृत्यु तर 18 जण जखमी; उलटलेल्या ट्रकला खासगी बसची धडकhttps://t.co/9xLgWDOrDL #policenama @Policenama1
— Policenama (@Policenama1) April 23, 2023
चौकशी समितीची स्थापनाकात्रज बोगद्याजवळ झालेल्या या अपघातानंतर जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. अपघाताच्या संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी चार सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीत पुणे परिवहन आयुक्त, बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग आणि वाहतूक शाखेचे अधिकारी यांचा समावेश आहे. या समितीला अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. समितीच्या अहवालानंतर उपाययोजना करण्यात येणार आहेत. |